प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
![]()

प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. २१ जून रोजी सकाळी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी उपप्राचार्य डॉ. पी.बी.भराटे यांनी योगा दिनानिमित्त उपस्थितांना योगाची विविध उदाहरणे देऊन योगाचे महत्व पटवून दिले. तसेच प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
योग दिनाच्या निमित्ताने संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, माजी उपप्राचार्य डॉ.पी.बी.भराटे, उपप्राचार्य प्रा.डॉ. जयेश गुजराथी, प्रा.डॉ.जी.एच.निकुंभ, डॉ.जयंत पटवर्धन, प्रा.डॉ. कल्पना पाटील, प्रा.पराग पाटील, प्रा. डॉ.व्ही. बी. मांटे, (सर्व उपप्राचार्य) कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उल्हास मोरे, वरिष्ठ जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. संदीप नेरकर, डॉ. योगेश तोरवणे, डॉ. वृषाली वाकडे, डॉ. हेमंत पवार, प्रा. वैशाली महाजन, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा.डॉ.विवेक बडगुजर, प्रा.रामभाऊ सुरडकर, प्रा. सुनील राजपूत, लेफ्ट. डॉ. प्रमोद चौधरी, तसेच एन. सी.सी चे ले. कर्नल समीर बोडक, पी. ओ. कृष्णा कोळी, सुभेदार जयदीप सिंग, एस. ए बनसोडे, समाधान पाटील, जे. व्ही. बाविस्कर शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील वाघ, प्रशांत माळी, विनायक सूर्यवंशी, प्रशांत वंजारी, सौ. रत्ना सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रताप महाविद्यालय, जी.एस हायस्कूल, पी.बी. ए स्कूल, प्रताप हायस्कूल, साने गुरुजी शाळा, डी.आर.कन्याशाळा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे विविध प्रात्यक्षिक योगशिक्षिका अर्चना सचिन पाटील व त्यांच्या टीमने केले. योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ क्रीडा संचालक प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश तोरवणे यांनी केले.

