1 min read

दिपक उखर्डु वाल्हे यांना निसर्ग मित्र समिती धुळे च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज -महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

Loading

दिपक उखर्डु वाल्हे यांना निसर्ग मित्र समिती धुळे च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज -महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिन व २१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सन्मान कर्तुत्वांचा व आदर्श नेतृत्वाचा
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पद्मश्री टॉवर हॉल,विजय पोलिस कॉलनी देवपूर धुळे येथे संपन्न झाला, यावेळी अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 19 – 20 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य व त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने पुरस्कार 2023 धुळे म न पा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी, धुळे जिल्हा परिषद चे अध्यक्षा सौ अश्वीनीताई पाटील मँडम,मुख्य वन संरक्षक अधिकारी दिगंबरजी पगार,हस्ती बँकेचे चेअरमन वृक्ष मित्र कैलासभाऊ जैन, राष्ट्रवादी चे धुळे शहर जिल्हा अध्यक्ष रणजीत राजे भोसले, आदर्श गृप चे चेअरमन महेंद्र भाऊ विसपुते, निसर्ग मित्र समिती चे राज्य उपाध्यक्ष आर डी आबा पाटील, राज्य उपाध्यक्ष आदर्श शेतकरी सुभाष बिंदवाल,, राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील, जिल्हाध्यक्ष डी बी पाटील, संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, जिल्हा सचिव विश्वासराव पगार ,नियोजन समिती चे अध्यक्ष अमृतराव पवार, सचिव देविदास भदाणे, कार्याध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष विलासराव देसले आदी उपस्थित होते
पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थी दिपक वाल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचे सहकार्य प्रेम पाठबळ वेळोवेळी असलेले मार्गदर्शन व आपली खंबीर साध यामुळेच हे यश शक्य आहे हे यश आपल्या सर्वांच आहे माझ्या एकट्याचे नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *