अ . भा . माळी . महासंघाच्या पदाधिका-ची धुळे येथे बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा…
![]()



अ . भा . माळी . महासंघाच्या पदाधिका-ची धुळे येथे बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा…
धुळे प्रतिनिधी(काशिनाथ माळी)
अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा आणि धुळेमहानगर पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांची सविस्तर बैठक आज दिनांक 17 जून 2023 रोजी ” महाजन हायस्कूल धुळे “येथे संपन्न झाली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ . भा . माळी . महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष . विलासराव पाटील हे होते . यावेळी मार्गदर्शक म्हणून नाशिक विभागीय अध्यक्ष श्री.वासुदेव देवरे हे होते .यावेळी धुळे जिल्हा अ . भा . माळी महासंघाचे अध्यक्षश्री. आर . के . माळी तसेच भरत रोकडे(विभागीयसचिव), संतोष माळी(उपाध्यक्ष) विनय माळी (पोलीसपाटील),राजेंद्र गवळी (कार्याध्यक्ष ) .हरिश्चंद्र रेडे (महानगर प्रमुख ) ज्ञानेश्वर माळी ( महानगर सचिव )काशिनाथ माळी ( राष्ट्रीय सचिव )हे मान्यवर देखील उपस्थित होते . यावेळी धुळे जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार होणार आहे .यामध्ये इयत्ता १० वी – ८५% गुण , इ १२ वी – ८० % गुण पदवी व पदव्युत्तर – A प्लस ग्रेड तसेच मेडिकल ‘ इंजिनिअरिंग ‘ स्पर्धापरीक्षा ‘ आणि अन्य विभागात विशेष प्राविण्य मिळविणारे जिल्हास्तरीय खेळाडू आणि Mpsc Upsc यात प्रविण्य मिळविणारे गुणवंत विद्यार्थी यांचा देखील सत्कार होणार आहे . यासाठी काही निकषांवर आधारित गुणवंतांची नावे घेतली जातील .हा कार्यक्रम धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात घेण्यात येणार आहे . यासंबंधीची तारीख लवकरच कळविण्यात येईल . या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते . यावेळी विलासराव पाटील व प्रा . डॉ . नामदेव माळी यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गुणवंतांच्या सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे . समाजाची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर पडल्यास ते जोमाने कार्यरत राहतात . म्हणूनच अशा कार्यक्रमांची आज गरज आहे . हे त्यांनी आवर्जून सांगितले .याप्रसंगी सुनील सोनवणे शिरपूर तालुका अध्यक्ष, सुधाकर महाजन,गोपाल देशमुख ,सुधाकर माळी ‘ प्रा . डॉ .नामदेव माळी यांच्यासह रमेश श्रीराम माळी ,राजेंद्र तानाजी माळी ,चंद्रकांत माळी,यांसहअनेक मान्यवर तसेच प्रशांत महाजन ‘ आणि हर्षल महाजन हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते .याप्रसंगी किशोर माळी , ह . भ. प .माळी गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक आर. के. माळी यांनी तर आभार प्रदर्शन काशिनाथ माळी यांनी केले .

