दत्तक शाळा उपक्रमांतर्गत मुसळी येथे विद्यार्थ्यांना चाळीस हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप
![]()



दत्तक शाळा उपक्रमांतर्गत मुसळी येथे विद्यार्थ्यांना चाळीस हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप
मुख्य कार्यकारी अधिकारी मा डॉ श्री पंकज आशिया व शिक्षणाधिकारी मा श्री विकास पाटील यांच्या प्रेरणेने शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खु! ही शाळा दत्तक घेतली आहे. यासाठी ते विविध उपक्रम या शाळेवर राबवत आहेत त्या अंतर्गत आज मुसई खुर्द येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना चाळीस हजाराचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.त्यात दप्तर ,सर्व विषयाच्या वह्या, कंपास, पेन, पेन्सिल, चित्रकला वही इत्यादी साहित्य देण्यात आले. सदर साहित्य दानशूर व्यक्ती सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक (बिनतारी संदेश) श्री. तुळशीराम माळी सर व त्यांचे सुपुत्र पुणे येथील आयटी कंपनीतील सॉफ्टवेअर डेव्हलपर श्री. दिनेश महाजन यांनी कै.सुनिता तुळशीराम माळी यांच्या स्मरणार्थ घेऊन दिले.नवीन साहित्य आपल्याला मिळालेले पाहून शाळेतील गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.याप्रसंगी श्री विजय पवार यांच्या सह गटशिक्षणाधिकारी श्री.नरेंद्र चौधरी,सौ.अनिता महाजन, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रवींद्र पाटील, उपाध्यक्ष भारत पाटील सदस्य सुनिल महाले,प्रदीप गुंजाळ,रेखा शिरसाठ,संगीता खैरनार,वैशाली पाटील ग्रामपंचायतीचे उपसरपंच आजम शेख, सदस्य सुरेश गुंजाळ,माधुरी ढमाले सिताराम पाटील आदी गावातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्र संचालन उपशिक्षक श्री.संजय गायकवाड यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.सुरेश गुंजाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ रजनी सूरमारे,उपशिक्षक संजय गायकवाड व वैशाली वाणी यांनी परिश्रम घेतले.यापूर्वी शाळेच्या विदयार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आले होते. शाळेतील सर्व विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी साठी कॅम्प चे आयोजन करण्याचा मानस असल्याचे विजय पवार यांनी मनोगतात सांगितले.

