नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचा इ. 10 वीचा 88.63% निकाल
![]()


नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचा इ. 10 वीचा 88.63% निकाल
नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी ता. मुक्ताईनगर विद्यालयाचा नुकताच शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यामध्ये विद्यालयाचा 88.63% निकाल लागला असुन विद्यालयातून एकूण 44 विद्यार्थी परीक्षेला बसलेली होती त्यापैकी 14 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झालेत 16 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये तर 9 विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत असे एकूण 39 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कुऱ्हे विभाग एज्युकेशन सोसायटी तसेच नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आलेले आहे तर विद्यालयातून सुयश हरिश्चंद्र पाटील याला 89.80% गुण मिळून तो विद्यार्थी प्रथम आलेला आहे तर कु. ममता भास्कर वाकोडे हिला 87.80 गुण मिळून ती विद्यालयातून द्वितीय आलेली आहे तसेच कु. अश्विनी श्रीकृष्ण चीम हिला 86.40 टक्के गुण मिळवून ती विद्यालयातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 15 जूनला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील सर यांनी इयत्ता आठवीच्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब बुके देऊन स्वागत करण्यात आलं. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील सर ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर श्री आर. पी. राठोड सर श्री एस. के. पाटील सर श्री सुनील नागे सर तसेच शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे तसेच सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन केलेले आहे.

