साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे नवागतांचे स्वागत व दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
![]()

साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे नवागतांचे स्वागत व दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
शाळेच्या पहिल्याच दिवशी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये इयत्ता 8 वी मध्ये प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनींचा स्वागत सोहळा करण्यात आला. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनींचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. याच प्रमाणे शाळेतून 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 10 (दहा) विद्यार्थ्यांनींच्या पालकांचा व विद्यार्थ्यांनींचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे 12 वी मध्ये MHTCET मध्ये 99% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनींचा देखील सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव दादासाहेब श्री. संदीपजी घोरपडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष नानासाहेब ॶॅड. श्री. अशोक बाविस्कर , संस्थेचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब श्री. गुणवंत गुलाबराव पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे मॅडम यांनी केले. अध्यक्षीय भाषण संस्थेचे सचिव मा. संदिपजी घोरपडे यांनी केले. प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन श्री. जे. एस. पाटील यांनी केले तर आभार श्री. दिलीप बळीराम पाटील यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी नुतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनिल पाटील सर व प्रतिनिधि श्री. विलास चौधरी सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

