चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज
विद्यार्थ्यांचे स्वागत
![]()


चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज
विद्यार्थ्यांचे स्वागत
अमळनेर प्रतिनिधी
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दिनांक 15/6 /2023 रोजी शाळेचा पहिला दिवस निमित्ताने सर्व विशेष विद्यार्थ्यांचे स्वागत वाजत गाजत करण्यात आले. व तसेच उपस्थित विशेष विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर औक्षण करून त्यांचा प्रवेश करण्यात आला. विशेष मुलांचा प्रवेश हा फुलांच्या पाकळ्यांवरून करण्यात आला. मुलांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आलेली होती. उपस्थित विशेष विद्यार्थी यांना शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो योगेश रघुनाथ महाजन सर यांच्याकडून वही स्केच बुक वाटप करण्यात आले तसेच उपस्थित विशेष विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना नाष्टा वाटप करण्यात आला. एकंदरीत कार्यक्रम खूप छान पणे पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

