1 min read

श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संस्थेची उत्तुंग भरारी

Loading

श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संस्थेची उत्तुंग भरारी

(प्रशांत घोडसे )येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ या शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत उत्तुंग कामगिरी बजावत आलेली आहे या संस्थेतील अनेक विद्यार्थी हे डॉक्टर ,इंजिनियर,अधिकारी तसेच परदेशातही उत्तुंग कर्तव्य बजावत आहेत तसेच एमपीएससी यूपीएससी परीक्षेतही संस्थेने नावलौकिक केले आहे तसेच यावर्षी मे महिन्यात झालेल्या महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सीईटी या परीक्षेत पियुष पाटील याने 99.9% गुण मिळून या शैक्षणिक संस्थेचे नाव यशस्वी शिखरावर नेले आहे पियुष पाटील ने PCM आणि PCB या दोन्ही ग्रुप मध्ये देखील उत्तुंग असे यश संपादन केले आहे पियुष हा श्री बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार भीमराव पाटील यांचा मुलगा असून त्याने JEE परीक्षेतही देखील 92 %मिळून ॲडव्हान्स परीक्षेत क्वालिफाय होण्याचा बहुमान मिळवला आहे व बारावी परीक्षेतही यश संपादन केले आहे तसेच मयंक साळुंखे यांनी सुद्धा 91% मार्क मिळून यश संपादन केले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री बालाजी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष यु एच करोडपती, संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर, प्राचार्य विजय बडगुजर ,प्राचार्य स्वाती बलखंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *