श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप
![]()

श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरून येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा भिला रोकडे यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप शुक्रवार दि. १० जून रोजी करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक योगदान म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महानगर अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी ,युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, युवक सरचिटणीस हितेश जावळे , भूगोलशास्त्र तज्ञ तेजस पाटील ,मुख्याध्यापक जोशी सर तसेच शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

