1 min read

प्रा. श्याम पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

Loading

प्राध्यापक श्याम पवार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

खेडी (प्र. ज.) येथे संपन्न
अमळनेर- रुक्मणीताई कला वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक शाम पवार हे दिनांक 31 5 2023 रोजी 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले त्यांच्या कार्याची दखल घेत खेडी गावातील ग्रामस्थ व राजमुद्रा अभ्यासिका खेडी यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राध्यापक शाम पवार यांचा सेवापूर्ती सोहळा खेडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर चे उपसभापती सुरेश पिरन पाटील हे होते तर अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक सुभाष सुकलाल पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सुरेश पाटील यांनी प्राध्यापक श्याम पवार यांनी आयुष्यात आपल्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात प्रा सुभाष यानी प्राध्यापक शाम पवार यांनी आपल्या आयुष्यात शैक्षणिक सामाजिक राजकीय व गावासाठी सार्वजनिक वाचनालय काढण्याचे जे कार्य केले ते कार्य नेहमी आमच्या सकट सर्व व्यक्तींना प्रोत्साहित करणार आहे असे म्हटले. सत्काराला प्रत्युत्तर देताना प्राध्यापक श्याम पवार यांनी समस्त गावकऱ्यांचे व राजमुद्रा अभ्यासिकेचे आभार मानले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आपल्याला जरी जीवनात कोणी दहा रुपयाची मदत केली असेल तरी ती मदत आपण आयुष्यात कधीच विसरू नये” आयुष्य जगताना पैसा हेच सर्वस्व नसून माणसं जोडने हे खूप महत्वाचे असते असे म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जिजाबराव पाटील यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभ्यासिकेतील सदस्य समाधान पाटील,निलेश पाटील,प्रतिक पवार, रोहन शिंदे, नरेंद्र पाटील, राज पाटील ,चंद्रकांत पाटील,किरण पाटील,सारंग पाटील,हितेश पाटील व इतर सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *