1 min read

जागतिक किर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांच्या उपस्थितीत,संचेती इन्स्टिट्युट व सुयोग ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांच्या वतीने

Loading

जागतिक किर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. पराग संचेती यांच्या उपस्थितीत

संचेती इन्स्टिट्युट व सुयोग ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांच्या वतीने

रविवार दि. 11 जून रोजी गरजुंसाठी मोफत तपासणी शिबिर

धुळे- भारतात हाडांसाठी सुप्रसिद्ध असलेले संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स ॲण्ड रिहॅब्लिटेशन, सुयोग ॲक्सीडेंट हॉस्पिटल-धुळे आणि भारतीय जैन संघटना यांच्या वतीने रविवार दि. 11 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सांधेदुखी, संधीवात, सांधेप्रत्यारोपण, कंबर दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, फ्रोजन शोल्डर, मणक्यांचे जुने आजार, डायबेटिक न्यूरोपॅथी, सायटिका पेन, लिगामेंट इन्ज्युअरी, टेनिस एल्बो, हिप व नी रिप्लेसमेंट नंतरचे उपचार आदी आजारांवर मोफत मार्गदर्शन व उपचार डॉ. के. ए. सैंदाणे बापू यांचे सुयोग ॲक्सिडेंट हॉस्पिटल, साक्री रोड, धुळे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले असून या शिबिरात जागतिक किर्तीचे अस्थिरोग, सांधेरोपण तज्ञ डॉ. पराग संचेती (एम.एस. एफ.आर.सी.एस. इंग्लंड) हे स्वत: व त्यांच्या सोबत मणके विकार तज्ञ डॉ. सिद्धार्थ अय्यर व इतर आठ तज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करणार आहे.

डॉ. पराग संचेती हे संचेती हॉस्पिटलचे संचालक असून जागतिक पातळीचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. सांधेरोपणाच्या विकारांबाबत त्यांनी जागतिक पातळीवर संशोधन केले आहे. संधोरोपणाच्या हजारो शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. डॉ. सिद्धार्थ अय्यर पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. त्यांनी एम.एस. (ऑर्थो) पूर्ण केले आहे. ते ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन आहेत. त्यांनी वॉशिंग्टन येथून फेलोशिप पूर्ण केली. जागतिक दर्जाच्या डॉक्टरांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी पुणे किंवा भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम स्पाइन सर्जन म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

सदर शिबिर मोफत असले तरी नोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिराला येतांना जुने केस पेपर्स व एक्स-रे घेऊन येणे अपॉईंटसाठी अनिल पवार (7774024105, 8469431217), जगन्नाथ बागले (9422289581) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. गरजुंनी मोफत तपासणी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संचेती इन्स्टिट्युट फॉर ऑर्थोपेडिक्स ॲण्ड रिहॅब्लिटेशन, डॉ. के. ए. सैंदाणे यांचे सुयोग हॉस्पिटल व भारतीय जैन संघटना यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *