1 min read

कळमसरे केंद्रातून दहावीच्या परिक्षेत

Loading

कळमसरे केंद्रातून दहावीच्या परिक्षेत

तांदळीचा उत्कर्ष पाटील द्वितीय

अमळनेर- शहापूर ता. अमळनेर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत तांदळी ता. अमळनेर येथील प्रगतीशील शेतकरी व पंचक्रोशीत ह.भ.प. ख्यातनाम असलेले व सलग 30 वर्षे रामकथा लावून नि:स्वार्थीपणे अन्नदान करणारे कै. बाजीराव आप्पा उर्फ हुला हरी पाटील यांचे पणतू व ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील यांचे सुपुत्र उत्कर्ष ज्ञानेश्वर पाटील हा विद्यार्थी 89.60% गुण मिळवून कळमसरे केंद्रात दुसरा आला आहे. त्याला एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकगण आर.डी. पाटील, आर.एस. पाटील, शिंपी सर, ए.के. धनगर सर तसेच रतिलाल अण्णा, एकनाथ अण्णा व सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. तांदळी येथील सर्व ग्रामस्थ मंडळ समाज बांधव, मित्र परिवार यांनी उत्कर्षचे सोशल मिडीयातून अभिनंदन व कौतुक केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *