अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनी
विजयी करा…
![]()

अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनी
विजयी करा…
अमळनेर प्रतिनिधी
दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, अमळनेर. पंचवार्षिक निवडणूक 2023 -28 सध्या निवडणुकीचा पॅनल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे .
कै टी.के ठाकूर व त्यांचे सुपुत्र स्वर्गवासी तात्यासाहेब शांताराम तुकाराम ठाकूर यांच्यावर तमाम अमळनेर करांचे प्रेम आहे .. आणि त्या प्रेमापोटी आजोबांना संचालकपदी तर स्व तात्यासाहेब शांताराम ठाकूर यांनी तीन पंचवार्षिक चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक इत्यादी पदे यांनी भूषवली होती.
आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी मित्रांचा मोठा गोतावळा निर्माण केला..
शांताराम तात्यांचे कार्य उल्लेखनीय होते.. असं म्हणतात “जो आवडे सर्वांना ,तोची आवडे देवाला “या उक्तीप्रमाणे तात्या आपल्यातून अचानकपणे निघून जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली .. त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचे भाचे गुणवंत सुरेश वाघ यांची अर्बन बँकेत अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवारी आमच्या परिवार तर्फे करीत आहे. बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी तात्यांनी सभासद हित जोपासले होते. कधीही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही. त्यांचे कार्य तेवत ठेवण्यासाठी अर्बन बँकेचे सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो आपले बहुमूल्य मत श्री गुणवंत सुरेश वाघ यांना आशीर्वादरुपी मत देऊन भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन मित्र परीवार यांनी केले आहे.

