शारदा माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत धर्मेश संतोष माळी प्रथम
![]()

शारदा माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत धर्मेश संतोष माळी प्रथम
अमळनेर प्रतिनिधी
शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे
मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये व कळमसरे दहावीच्या सेंटरमध्ये कळमसरे येथील आदर्श शेतकरी संतोष ओंकार माळी यांचे सुपुत्र धर्मेश संतोष माळी हा विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवून प्रथम आला..
शाळेत द्वितीय भावेश सुदाम कोळी याला ८८.४०,तर तर ऋषिकेश राजेंद्र चौधरी हा तृतीय आला त्याला ८६.४० गुण मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शारदा माध्यमिक विद्यालय व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्या कल्पना सिसोदिया मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांचे लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कळमसरे येथील सर्व ग्रामस्थ मंडळ,समाजबांधव, मित्रपरिवार यांनी त्यांच्यावर सोशल मीडिया या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला..

