बालाजी विद्यालयाच्या दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी!
![]()

बालाजी विद्यालयाच्या दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी!
गांधली- पिळोदे येथील बालाजी विद्यालयाचा मार्च 2023 च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 96% लागला असून विद्यालयाच्या उत्तम निकालाची यशस्वी परंपरा कायम राहिली.
मार्च 2023 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुलींनी उत्तम यश संपादन करून बाजी मारली आहे. एकूण 45 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यात 14 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह यश प्राप्त केले. 19 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 10 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
बालाजी विद्यालयातून प्रथम येण्याचा मान दोन विद्यार्थिनींना मी प्राप्त झाला आहे.
प्रथम तनु विकास वारुळे 90.80%,
रोशनी मनोहर बाविस्कर 90.80%, द्वितीय बुशरा आरिफ पिंजारी 89.60%, तृतीय कल्याणी किशोर पाटील 88% व साक्षी अविनाश बडगुजर 88%, चतुर्थ साक्षी श्याम बडगुजर 87.80%, पाचवी रेवती अनिल निकुंभ 87.60%, याव्यतिरिक्त
रोशनी वसंत पाटील 87%, वैष्णवी प्रमोद वारुळे 85.40%, साहिल अमिन पिंजारी 80.25%, भाग्यश्री दीपक निकम 79.20%, लक्ष्मण पारधी 79.20%, हर्षदा रवींद्र साळुंखे 78%, मयुरी ज्ञानेश्वर पाटील 76% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करून विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाप्राप्ती बद्दल खा.शि.मंडळ कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,शालेय समिती अध्यक्ष तथा डायरेक्टर श्री गिरीश शिंदे, उपाध्यक्ष सुधाकर साळुंखे व सदस्य कमिटी शालेय समिती, संस्थेचे प्रभारी अध्यक्ष पी.पी. सुर्यवंशी, कायम संचालक रमेश पाटील,सचिव सुनील पाटील व संपूर्ण कार्यकारिणी मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. याव्यतिरिक्त पिळोदे सरपंच भारती पाटील, गांधली सरपंच नरेंद्र पाटील,उपसरपंच, सदस्य-गांधली -पिळोदे, बालाजी संस्थान कार्यकारी मंडळ, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस व्ही पाटील, मुख्याध्यापक एन.वाय.पाटील, बी.ए.सयाजीराव, सी.वाय निकुंभ, पी.जे.निकम, आशिष शिंदे जे.एच.लोहार,एस के वंजारी,श्रीमती एस.इ.देसले,श्रीमती पी.एस.अहिरराव,
श्री.एन एस निळे, पी.एस.देवरे,मयूर पाटील,एस.डी.सूर्यवंशी,श्रीमती एस जे पाटील,शेख मुसा, एस.बी.सोनवणे, बी.एस.भिल, आर पी. पवार आदींनी विद्यार्थ्यांच्या उत्तम यशाबद्दल अभिनंदन व शुभाशिष दिले आहेत.

