अमळनेर तालुक्यात इयत्ता दहावीच्या
निकालात मुलींची आघाडी…..
![]()
अमळनेर तालुक्यात इयत्ता दहावीच्या
निकालात मुलींची आघाडी…..
तालुक्यातील काही शाळांचा निकाल सविस्तर मराठी लाईव्ह न्यूजच्या वेबसाईटवर पहा …..

अमळनेर प्रतिनिधी- इयत्ता दहावी मार्च 2023 चा ऑनलाईन निकाल आज 2 जून 2023 रोजी दुपारी एक वाजता घोषित झाला. अमळनेर तालुक्यातील काही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे व या वर्षाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलीनीं आघाडी घेतली आहे.
काही शाळांचा निकाल खालील प्रमाणे सविस्तर…
1)
साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर
शालांत परीक्षा (10 वी) निकाल 99.15%
अमळनेर. शाळेतील इ. 10 वी मार्च 2023 शाळेतून 119 विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 118 उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल 99.15% लागला त्यात 10 विद्यार्थिनी 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाल्या असुन,
प्रथम- वैद्य मौर्विका मिलिंद – 97.00 %
द्वितीय- पाटील सई विलास- 96.20%
तृतीय- पाटील चेतना प्रविण – 95.00%
चतुर्थ- पाटील आदिती अंकुश – 94.60%
पाचवी- येवले मयुरी गणेश – 93.00%
तसेच 63 विद्यार्थिनी *डिस्टिंक्शन तसेच जवळ जवळ सर्वच विद्यार्थिनी प्रथम वर्गात पास झाल्या आहेत. संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळालेल्या विद्यार्थिनी –
1) पाटील सई विलास
2) येवले मयुरी गणेश
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे संस्थापक मा. आ. साथी. श्री. बापूसो. गुलाबराव वामनराव पाटील, अध्यक्ष मा. श्री. आबासो. हेमकांत पाटील, सचिव मा. श्री. दादासो. संदीप घोरपडे सर , शालेय समिती अध्यक्ष अँड. श्री. नानासो. अशोक बावीस्कर व सर्व संचालक मंडळ यांनी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
शाळेने तालुक्यातून सर्व प्रथम येण्याचा व शाळेचा निकाल सर्वात जास्त राहण्याची परंपरा कायम ठेवली.
2)
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल
यशाची परंपरा कायम…
अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल चा इयत्ता दहावी मार्च 2023 चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे..
शाळेत प्रथम पाटील भाग्यश्री महेंद्र-87.40 द्वितीय पाटील तेजस पुंडलिक-86.60,तृतीय पाटील हर्षला विनायक-86.40,चतुर्थ चौधरी पुजा रमेश-83.80 पाचवा नंबर पाटील संजना शिवाजी-82.60 हिने यश संपादन केले आहे.
खालील विदयार्थांना 80 टक्के पेक्षा अधिक मार्क मिळालेले आहेत.
माळी मेघना अनिल-82.40,
पाटील राजश्री नाना-82.00 ,
पाटील तनुजा समाधान-81.60,
पाटील वैशाली श्याम-81.60,
महाजन प्रणाली ज्ञानेश्वर-81.20
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल गेल्या 20 वर्षापासून दहावीची यशाची परंपरा कायम टिकवलेली आहे..सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील ,सचीव श्रीमती मंदाकिनी शांताराम पाटील, व संचालक मंडळ यांनी केले तर यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन ,शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांनी केले.
3)
एस.एस.सी परीक्षेत पी.बी.ए इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे निर्भळ उत्तुंग यश संपादन शाळेचा निकाल 100%.
एस.एस.सी वर्ष 2022.23 परीक्षेचा निकाल हा नाशिक बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून पी.बी.ए इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षेत निर्भळ उत्तुंग गगन भरारी घेणारे असे स्वरूपाचे यश संपादित केले आहे. तसेच आकाशाला गवसनी घालावे अशा प्रकारचे दैदिव्यमान सूर्याप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला झाळाळी प्राप्त करून देणारे यश हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून संपादित केले. सर्वांना सार्थ अभिमान प्राप्त करून देणारा हे यश आपण म्हणू शकतो. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गगनात मावेनासा आनंद प्राप्त झालेला दिसून आला. प्रथम पाच उच्च श्रेणीमध्ये प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे -(1) प्रितेश विकास मगरे 96.00%, (2)सिद्धेश शरद शिरोडे 95.80%, (3)आर्या सचिन आवनकर 94.40%, (3) सुचिता अभयराज यादव 94.40, (4) ओम विजयकुमार साळुंखे 94.00%, (5) सोनाली कैलास लोहार 93.60%.
सदर विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन सहकार्य व यशाशक्ती स्वरूपाची मदत शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराती,मुख्याध्यापक जे. एस.देवरे,पर्यवेक्षिका एम.एस.बारी,महेश माळी,व्ही.पी.बडवे,व्ही.एस. अमृतकर,श्रवण पाटील,अशोक महाजन,प्रशांत वंजारी, राजश्री दाभाडे समस्त शिक्षक वृंद वर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवृंद वर्ग यांचे लाभले.
4)
गं.स.विद्यालयाची दहावीच्या निकालात भरारी
अमळनेर(प्रतिनिधी):-
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित गं. स. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९१.८९% लागला असून शाळेतून तब्बल १३ विद्यार्थ्यांनी ९० % पेक्षा जास्त गुण मिळवून बाजी मारली आहे.३५८ विद्यार्थ्यांपिकी १३१ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह तर १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत.
शाळेतून प्रथम-पाटील देवांश दिनेश ( ९४.६०%),कलालीकर,
द्वितीय-
बारी प्रणव रमेश (९४.४०%),तृतीय-
सैंदाने संकेत केशव (९४.२०%),चतुर्थ-
भावसार कृष्णा शैलेश (९३.४०%),मोराणकर ओंकार सूर्यकांत (९३.२०%),पाटील तेजस अनिल(९२.२०%),पाटील सुशील किशोर (९१.८०%),पाटील निलेश देवेंद्र (९१.४०%),चौधरी निलेश जगदीश(९१.००%),डेरे अमेय प्रवीण (९०.२०),बोरसे मयूर अशोक (९०.२०%),बडगुजर मोहित गिरीश(९०.२०),बारी ओम कैलास(९०.००%) गुण मिळविले आहेत.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,माजी चेअरमन योगेश मुंदडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
5)
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा ९४.८२ टक्के निकाल
अमळनेर: एसएससी बोर्ड नाशिक शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल जाहीर केला.
येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.८२ टक्के लागला असून
एकूण ५८ पैकी ५५ पास विद्यार्थी पास झाले आहेत.
यात प्रथम कृष्णा रघुनाथ पाटील (९०%) द्वितीय भाविक संजय भामरे (८८.२०%)
तृतीय कृष्णा शांताराम पाटील (८७.८०%)
चतुर्थ तन्वी अशोक पाटील (८६.६०%) पाचवा आरुषी ज्ञानेश्वर पाटील (८६ .४०%) यांनी गुण मिळवून यश संपादन केले असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासो.प्रा.डी डी पाटील,रावसो. प्राचार्य के. डी पाटील ,सचिव राधेश्याम पाटील, संचालक नंदकुमार पाटील, शैलेंद्र पाटील,प्रा.नयना पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
6)
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला असून मुलींनी बाजी मारली आहे. योगिता देविदास पाटील व नेहा संजय पाटील या दोन्ही ९१.६० टक्के मिळवून संयुक्तरित्या शाळेत प्रथम आल्या आहेत.
जयश्री अधिकार पाटील ९१.२० टक्के मिळवून द्वितीय तर मयुरी विठ्ठल पाटील ९१ टक्के मिळवून तृतीय आली आहे. संस्थेच्या चेअरमन सुहासिनी अनिल पाटील , सचिव श्रीकांत पाटील , मुख्याध्यापक प्रकाश पाटील व माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
7)
श्रीमती द्रौ रा कन्याशाळेचा एस एस सीचा ९६.६९ टक्के निकाल
अमळनेर(प्रतिनिधी):-
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेचा दहावीचा निकाल ९६.६९ टक्के लागला असून शाळेतून तब्बल ३१ विद्यार्थिनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून पास झाल्या आहेत.२६३ विद्यार्थिनीं पैकी ३१ विद्यार्थीनी विशेष प्रविण्यासह १६६ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ७५ विद्यार्थिनी पास झाल आहेत.
शाळेतून प्रथम- पाटील ऋतुजा मनोहर ( ९६.२०%),द्वितीय-
जैन प्रियंका अनिल (९५.८०%),तृतीय-
माळी प्रमल महेश (९४.८०%),चतुर्थ श्रेणीत चार विद्यार्थीनी असून त्यात
पटेल महेश गुंजन (९४.६०%), महाजन यशस्वी प्रवीण (९४.६०%),
चौधरी चेतना बाळासाहेब (९४.६०%), पाटील राही दिलीप (९४.६०%), तर पाचव्या क्रमांकावर तीन विद्यार्थीनी असून त्यात
पवार प्राची योगेश (९३.८०%),
जोशी साक्षी योगेशकुमार (९३.८०%), निकम जान्हवी एकनाथ (९३.८०%),
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष व शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल,संचालक हरी अण्णा वाणी, नीरज अग्रवाल,योगेश मुंदडे, डॉ संदेश गुजराथी, कल्याण पाटील ,विनोद भैया पाटील,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


8)
लोकमान्य विद्यालयाचे घवघवीत यश!
अमळनेर मार्च 2023 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेच्या रिजल्ट नुकताच जाहीर झाला. लोकमान्य विद्यालयातून प्रथम कु.प्रणाली प्रवीण महाजन शे.९५% गुण मिळविले तर द्वितीय चि.शिवम जय किसान भावसार शे.९४.४०% गुण मिळविले, कु.तृतीय प्रज्ञा मधुकर सोनार शे.९३.२०% गुण तर कु.वैष्णवी अरुण महाजन शे.९२.२०% गुण व चि. सुमित राजेंद्र महाजन यास शे.९१.२०% गुण प्राप्त झाले. विद्यालयाच्या एकूण निकाल ८९.४१% लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लो.शि मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.अरविंद फुलपगारे, चिटणीस विवेकानंद भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज.जोशी, मुख्याध्यापक रविंद्र लष्करे, ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
9)
अमळनेर येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल निकाल 96.42 %
अमळनेर- येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल निकाल 96.42 टक्के लागला आहे. यात 13 विद्यार्थिनीं ह्या विशेष प्राविण्यासह तर 44 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
1️⃣ प्रथम- मेवाती बुशरा नाज माजिद खान 81.60%
2️⃣ द्वितीय- शफिया नसीरोद्दीन मुजावार 81.40 %
3️⃣ तृतीय- रंगरेज आफिया मोहम्मद आरिफ 80.00%
4️⃣ तृतीय – बेलदार आयशा सिद्दिका नईमोद्दीन 80.00
10)
निंभोरा हायस्कूल चा 100% निकाल
==================माध्यमिक विद्यालय निंभोरा ता अमळनेर विद्यालयाचा इ 10 वीचा निकाल 100%लागला असूण पहिले पाच विद्यार्थाचा गुणाणूक्रम…
1) कु. नयना समाधान मनोरे- 87 %
2) चि. हंसराज लक्ष्मण पाटील 83.60 %
3) कु. नीता रामचंद्र पारधी- 83.4% 4) चि. तुषार मल्हारी धनगर 83.30 % 5)कु.निकता मधुकर कोळी-83.%
वरिल प्रमाणे पहिले पाच विद्यार्थो गुणा अनुक्रमानुसार उत्तीर्ण झाले असूण उत्तीर्न विद्यार्थाचे अभिनंदन संस्थेचे सचिव नानासाहेब गजानन चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब श्री बी.एच. चौधरी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन केले
11)
गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा
या शाळेने राखली यशाची परंपरा कायम
SSC मार्च 2023 निकाल
1)पाटील रुचिता संदीप – 89.00%
1)पटेल आवेश कलीम – 89.00%
2)पाटील हर्षदा शिवाजी – 88.80%
3)पाटील प्रतीक्षा संदीप – 88.00%
4)पाटील प्रणव प्रविण – 87.80%
4)पाटील केतन सुनिल – 87.80%
5)शेख करीम अमीन – 87.60%
शाळेतील एकूण 35 पैकी 35 विद्यार्थी उत्तीर्ण यात
विशेष प्राविण्य – 23
प्रथम श्रेणी – 10
द्वितीय श्रेणी -02
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे *संस्थाध्यक्ष दादासो. मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, संस्थेचे उपाध्यक्षा तसेच न.पा.अमळनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो.जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील, संस्थेचे सचिव बापूसो. लोटन देसले, संस्थेचे संचालक मंडळ तसेच राजवड, खेडीढोक, दगडी सबगव्हाण ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक योगेश सुर्यवंशी सर, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
12)
गुरुदत्त एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन माध्यमिक विद्यालय अंतुरली-रंजाणे ता अमळनेर विद्यालयाचा निकाल 97.43 लागला
प्रथम क्रमांक कु. कोमल महेश पाटील – 91.40
व्दितीय क्रमांक कु पूनम संजय पाटील
89.40
तृतीय क्रमांक कु. मयुरी रविंद्र पाटील – 87.80 प्राप्त केला आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सौ. ताईसाहेब तिलोत्मा रविंद्र पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनी अभिनंदन केले आहे. भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
13)
ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित न्यु. इंग्लिश स्कूल, प्र. डांगरी येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. पाटील रोहिणी लक्ष्मण हिने 91.00 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर कु. कुमावत मयुरी संभाजी 89.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक* तर कु. भोई नंदनी युवराज हिने 88.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष श्री.आबासो.जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
14)
ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित विनायकराव यादवराव पाटील माध्य. विद्यालय, करणखेडे येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. पाटील समीक्षा किशोर (मुडी) हिने 90.20 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर कु. कोळी देवयानी दिनकर (करणखेडा) 89.60% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. लोखंडे पौर्णिमा सुधाकर (करणखेडा) हिने 87.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील *अध्यक्ष श्री.आबासो.जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
15)
यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बुद्रुक येथील इयत्ता 10 वी चा निकाल शंभर टक्के
अनुदानित आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक चा (शैक्षणिक वर्ष सन 2022 -23 ) इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय माई सो विद्याताई युवराज पाटील, तसेच संस्थेचे सचिव आदरणीय नानासो युवराज पाटील साहेब व संस्थेचे सर्व संचालक यांनी यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व माननीय मुख्याध्यापक सो यांचे सर्वांचे अभिनंदन केले आहे.
16)
मांडळ येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडळ ता.अमळनेर विद्यालयाचा निकाल ९१.६६% लागला आहे. यात १३ विद्यार्र्थी विशेष प्राविण्यासह तर २७ विद्यार्थि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ ओबीसी शिक्षक परिषद, शिक्षक भारती, शिक्षक सेना, समता शिक्षक परिषद, प्रहार संघटना चे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या…
1️⃣ प्रथम- कु.मेघना अशोक सैंदाणे ९०.२० %
2️⃣ द्वितीय- कु.प्रिती बापू टोकरे कोळी ८९.२० %
3️⃣ तृतीय- कु.जयश्री दिपक बडगुजर ८५.२० %
यशवंत-गुणवंत-किर्तीवंत मुला-मुलींचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादसो.नारायण लोटन कोळी ,चेअरमन भाऊसो.तनेश नारायण शिरसाठ ,सचिव भाऊसो. केवल नारायण शिरसाठ ,मुख्याध्यापक बी.बी.चव्हाण व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
17)
100 टक्के निकालाची परंपरा कायम
अमळनेर येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचा निकाल 100 %
अमळनेर- येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात 20 विद्यार्थिनीं ह्या विशेष प्राविण्यासह तर 07 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.*
1️⃣ प्रथम- दिव्या रवींद्र खैरनार 88%
2️⃣ द्वितीय- हर्षदा सुनील मोतीराळे 86%
3️⃣ तृतीय- मयुरी विठ्ठल पाटील 85.40%
4️⃣ चतुर्थ- दिव्या अनिल पाटील 85%
*यशवंत-गुणवंत-किर्तीवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नानासो विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष बाळासो अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी आबासो डी.बी. पाटील, शिक्षण मानद संचालक प्रा.सुनील गरुड सर, प्राचार्य गायत्री भदाणे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
18)
नंदादीप माध्य विद्यालय निंब ता अमळनेर विद्यालयाचा इ 10 वीचा निकाल 100%लागला असूण पहिले पाच विद्यार्थाचा गुणाणू क्रम
1 चौधरी तेजस गणेश-86%
2- गुजर हर्षल विकास- 83.90%
3- क्षिरसागर पूजा पूंजू-80.80
4- धनगर रोहन झानेश्वर-79.80%
5- आगळे अभिषेक गौतम-78.80
वरिल प्रमाणे पहिले पाच विद्यार्थो गुणा अनुक्रमानुसार उत्तीर्ण झाले असूण उत्तीर्न विद्यार्थाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब Adv..श्री राजेंद्र भगवान चौधरी शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री ए बी चौधरी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन केले.
19)
ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित सु. हि. मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, मारवड येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. लोहार नंदीनी महेंद्र (मारवड) हिने 94.00 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर चौधरी घन:शाम चंद्रकांत (मारवड) 93.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. पाटील कामिनी दगडू (बोहरा) हिने 92.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष श्री.आबासो.जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
20)
किसान विदया प्रसारक मंडळाचे – किसन दाजी पाटील हायस्कूल सावखेडा हायस्कूलचा निकाल 100/. लागला .पहिली विदयार्थ्यांनीस 90.40/. मिळाले. सर्व विदयार्थ्यांना शुभेच्छा अध्यक्ष व मुख्याध्यापक- महाले सरांनी दिल्या.
21)
कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस शाळेचा मार्च २०२३ मा. शा. प्र.परीक्षेचा निकाल १००% लागला.३२ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यात श्रध्दा व सबुरी पाटील ह्या दोघी बहिणी ८५% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजय सोनवणे सचिव व तथा मुख्याध्यापक बापूसौ विजय सोनवणे व शिक्षक यांनी केले.
22)
श्री दत्त विद्या मंदिरचा निकाल 84 टक्के
पातोंडा ता.अमळनेर –
येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 84 टक्के लागला असून त्यात वैष्णवी रत्नाकर पाटील (89.40% प्रथम) , अंजली संभाजी बोरसे (87.80% द्वितीय), शुभांगी भगवान पवार (86.20% तृतीय), पुनीत सेवाराम पाटील (85.80% चतुर्थ), साक्षी शिवदास पाटील ( 84.80% पंचम) क्रमांक पटकावला आहे. तर विज्ञान विषयात शुभांगी पारधी (97 गुण), वैष्णवी पाटील (96 गुण) , कोमल पाटील (96 गुण) , पुनीत पाटील (95 गुण), साक्षी पाटील (94 गुण) , मेघा शिंदे (94 गुण) , देवेंती भोई (92 गुण), सपना कोळी (90 गुण) यांनी गुण मिळवत विशेष प्राविण्य प्राप्त केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांनी अभिनंदन केले.
23)
स्व.सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा माध्य. विदयालयाचा निकाल 100 टक्के
आज दि.02/06/2023 रोजी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 चा निकाल जाहीर झाला असून यात आपल्या स्व सौ पद्ममावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयाचा 100/ निकाल लागला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या वर्षी विद्यालयातून कु.वासुदेव दिलीप पाटील 89.60 (प्रथम) कु.ओम युवराज पाटील 87.20/ (व्दितीय) कु.भाग्यश्री माळी 86.00/ (तृतीय) कु.मोहिनी मनोज पाटील 85.40/ (चतृर्थ ) गुण प्राप्त करुन यश संपादन केले. यांच्या यशाबद्दोल सर्वांकडून कौतुक होत आहे.
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.प्रकाशभाऊ मुंदडा,सचिव श्री.नरेंद्रभाऊ मुंदडा, सहसचिव श्री. योगेश भाऊ मुंदडा तसेच मुख्याध्यापक,सर्व शिक्षक & शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दहावीतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ ओबीसी शिक्षक परिषद, शिक्षक भारती, शिक्षक सेना, समता शिक्षक परिषद, प्रहार संघटना चे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या…








