1 min read

दहावीचा निकाल जाहीर, मुलीच ठरल्या सरस…

Loading

दहावीचा निकाल जाहीर

विशेष प्रतिनिधी.

राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.
विभागवार निकाल..
कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के
ग्रंथपाल आरती शर्मा व मुख्याध्यापक श्री गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढीव वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *