ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित सु.हि.मुंदडे हायस्कुल मारवडचा इ.10 वी मार्च 2023 चा निकाल शंभर टक्के..
![]()

ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, मारवड येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. लोहार नंदीनी महेंद्र (मारवड) हिने 94.00 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर चौधरी घन:शाम चंद्रकांत (मारवड) 93.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. पाटील कामिनी दगडू (बोहरा) हिने 92.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष श्री.आबासो.जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

