राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालयाच्या वतीने अमळनेरला १६ जुनला राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन..
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालयाच्या वतीने अमळनेरला राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन..
14 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार अमळनेरात शिबिराचे करणार उद्घाटन


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय आपणास विनंती करण्यात येते की राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय शिबिर शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 8:00 वा पासून आयोजित करण्यात येत आहे. तरी
सदर शिबीराला खा शरदचंद्रजी पवार, जयवंतराव पाटील ,अजित पवार विरोधीपक्ष नेते , इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या राज्यव्यापी शिबाराच्या आयोजन ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.उमेश दादासाहेब पाटील तसेच ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ.रिताताई बाविस्कर यांनी केलेले असून आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब अमळनेर तालुक्यात तब्बल २००९ साली आलेले होते तर आदरणीय साहेबांचे आगमन १४ वर्षानतंर येत असल्याने मोठया जल्लोषात त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
या वक्त्यांचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात होणार मार्गदर्शन
शेषराव चव्हाण लेखक राजेश टोपे माजी मंत्री, , जितेंद्र आव्हाड माजी मंत्री ,रावसाहेब कसबे लेखक ,प्रा हरी नरके जेष्ठ विचारवंत व लेखक, सतीश पाटील माजी मंत्री, बसवराजजी पाटील प्रदेश सरचिटणीस ,अनिल भाईदास पाटील मुख्य प्रतोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गुलाबराव देवकर माजी मंत्री वरील सर्व पदाधिकारी राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत..
तर महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर*
महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य, प्रदेश समन्वयक ग्रंथालय विभाग महिला प्रदेश सचिव यांनी केले आहे.

