1 min read

जळगांव जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीत मोलाचे योगदान असलेले नाव साहित्यिक जयसिंग वाघ- साहित्यिक सोपान भवरे अमळनेर

Loading

जळगाव जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीत मोलाचे योगदान असलेल नाव मा.जयसिंग वाघ..

जळगाव जिल्ह्यात सत्यशोधक ते आंबेडकरी चळवळीत योगदान देणारे अनेक लोक आहेत त्यात अत्यंत नम्र, विनयशील, अभ्यासू,विद्रोही विचारवंतात मा. जयसिंग वाघ यांचे नाव घेतले जाते. अगदी मेहनती कुटुंबातून आलेले जयसिंग वाघ भुसावळ तालुक्यातील फेकरी ह्या गावाचे रहिवाशी आहेत. फेकरी गाव हे पुर्वी पुरोगामी चळवळीचे केंद्र होते. येथे डाॅ. बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेले विद्रोही लोक यायचे..भुसावळ, दीपनगर, फेकरी येथे सतत कार्यक्रम होत असत..हया कार्यक्रम आयोजनात वाघ साहेब पुढाकार घेत..राजा ढाले, नामदेव ढसाळ, वामनदादा कर्डक, कांशीराम साहेब, रावसाहेब कसबे, वामन मेश्राम, पानतावणे, या सारखे लोक येथे भाषणासाठी यायचे..मा.जयसिंग वाघ साहेब एक उत्तम वक्ता आहेत..महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी समाज प्रबोधनासाठी ते जातात. सत्यशोधक चळवळीत ते अग्रेसर आहेत..सर उत्तम लेखक आहेत..त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्या जीवनावर पुस्तके लिहली.शिस्तीला प्रथम प्राधान्य तर विनयशीलता आयुष्यात जपणारा माणूस म्हणून साहेब परिचित आहेत.सदैव मदतीचा हात देऊन नवसाहित्य लिहिणार्या लोकांना प्रोत्साहन देतात..आज त्यांचा वाढदिवस त्या निमित्त त्यांना मंगलमय शुभकामना!!

सदर लेखाचे संपादक मराठी लाईव्ह न्युज चे अतिथी संपादक सोपान भवरे यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *