1 min read

मुंबई ,ठाणे ,पालघर, रायगड विभागातील शाळांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी झंझावती दौरा
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपसंचालक कार्यालयात मुंबई येथे ठिकाणी धडक

Loading

मुंबई ,ठाणे ,पालघर, रायगड विभागातील शाळांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी झंझावती दौरा
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपसंचालक कार्यालयात मुंबई येथे ठिकाणी धडक


*मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):मुंबई उपसंचालक अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर ,रायगड या विभागातील शाळा शिक्षक शिक्षकाचेे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक शिक्षकेतरांसाठी दिवस-रात्र* *मेहनत करणारे , शिक्षकांच्या कामासाठी तळमळीने सदैव कार्यरत राहणारे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज शिक्षण उपसंचालक श्री संदीप सांगवे साहेब व निरीक्षक श्री सुनील सावंत साहेब यांची भेट घेऊन खालील प्रश्न तात्काळ सोडवले*

1) प्रलंबित शालार्थ आयडी तात्काळ मंजूर करून मिळावे
2) 20 %,40%, 60% अनुदान आदेश त्वरित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांना मिळावे , दोन ते तीन दिवसात सर्व शाळांना आदेश मिळतील
3) पेंडिंग संच मान्यता त्वरित मिळाव्यात – उपसंचालक कार्यालयवरील संच मान्यता त्वरित वितरित केल्या जातील
4) वैयक्तिक मान्यता
5) सेवा सातत्य
6) शाळांच्या प्रथम मान्यता
7) अनुकंप तत्त्वावरीलल मान्यता
तसेच उपस्थित शिक्षक शिक्षकेतरांच्या वैयक्तिक प्रश्न सुद्धा मांडले,
श्रीमती माने मॅडम ज्ञानोदय विद्यामंदिर ठाणे यांची न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे. वैयक्तिक मान्यता तात्काळ करून घेतली व त्याच ठिकाणी वैयक्तिक मान्यता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व उपसंचालक श्री संदीप संगवे साहेब यांच्या हस्ते वितरित केली
लवकरच रत्नागिरी आणि पालघर शिक्षण विभाग कार्यालयाला आदरणीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर भेट देणार आहेत, सर्व शिक्षक आमदारांमध्ये सतत पायाला भिंगरी लावून , केवळ कोकण विभागातील नव्हे तर राज्यातील शिक्षक शिक्षिकांचे प्रश्न सर सोडवत असतात, एवढेच नव्हे तर प्रत्येक शिक्षकाचे आधारस्तंभ ज्ञानेश्वर म्हात्रेसर झाले आहेत यातील मात्र शंका नाही, प्रचंड मेहनत, सरांच्या कामाचा धडाका सध्या रेकॉर्ड ब्रेक होत चाललेला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही , या चार महिन्यात शेकडो शाळांची शिक्षक शिक्षकांची रखडलेली प्रलंबित कामे आमदार सरांनी पूर्ण करून दिली आहेत
*आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर घेत असलेल्या मेहनतीला तोड नाही, सरांचे मानावे तेवढे आभार कमीच पडतील, सर घेत असलेल्या मेहनतीला ईश्वर नेहमी यश देवो हीच प्रार्थना.
अशी माहिती विष्णू विशे संपर्कप्रमुख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *