1 min read

जुनी पोलीस लाईन अमळनेर या जागेवर असलेली जुनी निवासस्थाने अत्यंत
खराब व जीर्ण स्थितीत आहेत ती खाली करा….

Loading

जुनी पोलीस लाईन अमळनेर या जागेवर असलेली जुनी निवासस्थाने अत्यंत
खराब व जीर्ण स्थितीत आहेत ती खाली करा….

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे आमदार अनिल पाटील १२ जूनपासून करणार बेमुदत उपोषण…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
वरील विषयास अनुसरून संदर्भ क्र.1 अन्वये अमळनेर जि.जळगाव येथे उपविभागीय अधिकारी व तहसील
कार्यालय इमारत बांधकाम करणे. ता. अमळनेर या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर कामाचे
तांत्रिक मान्यता आदेश व निविदा प्रक्रिया पुर्ण झालेली असून विषयांकित कामाचे कार्यारंभ आदेश दि. 22/12/2022 रोजी संदर्भ क्र.3 अन्वये देण्यात आलेले आहेत. सदर जागा टी.पी.नं.66+67 ( जुनी पोलीस लाईन अमळनेर) येथील जागा संदर्भ क्र.2 अन्वये
उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी
टी.पी.नं. 66+67 (जुनी पोलीस लाईन अमळनेर) ही जागा मा.जिल्हाअधिकारी सो. जळगाव यांच्या कडील
आदेशने वितरीत करण्यात आलेली आहे.
तरी देखील टी.पी.नं.66+67 (जुनी पोलीस लाईन अमळनेर) येथील निवासस्थानात आजतागायत
पोलीस विभागातील कर्मचारी वास्तव करीत आहेत.तसेच मा.ना. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या दालनात दि.26/01/2023 रोजी
विषयांकित कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. बैठकीत विषयांकित काम सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
सदर टी.पी.नं. 66+67 (जुनी पोलीस लाईन अमळनेर) या जागेवर असलेली जुनी निवासस्थाने अत्यंत
खराब व जीर्ण स्थितीत तसेच सदरील इमारती राहण्यायोग्य नसल्याबाबत पोलीस निरीक्षक, अमळनेर यांना
संदर्भ क्र. 4 अन्वये कळविण्यात आलेले आहे. तसेच पोलीस वसाहतीस नवीन जागा उपलब्ध करुन दिल्यानंतरही
जिल्हाधिकारी यांच्याबडुन जागा अद्यापर्यंत Recovery का करण्यात आली नाही. तसेच संदर्भ क्र. ५ अन्वये मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, पी.आय.एल. क्र. 4176-2023 दि.
12/04/2023 रोजीचा निकाल.
त्यामुळे भविष्यात जिर्ण इमारतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचा-यांच्या जिवितास धोका संभवू शकतो. तसेच
नवीन पोलीस वसाहतीत बऱ्याच खोल्या रिक्त आहेत. तरी जुनी पोलीस लाईनची जागा खाली करण्याबाबतच्या सुचना पोलीस विभागास करुनही पोलीस विभागाकडुन कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही आहे. आपल्या व सुप्रीम कोर्टाच्या आदेशासाठी पोलीस विभागाकडुन केराची टोपली दिली आहे. व हा एक प्रकारेआपला व कोर्टाचा देखील अपमान आहे.सदर जागा दि. १२/०६/२०२३ पर्यंत खाली करुन नवीन इमारतीचे बांधकाम सुरु झाले नाही तर
दि. १२/०६/२०२३ पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमळनेर तालुक्यातील नागरिकांसह बेमुदत उपोषणास
बसणार आहे व पुढील होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अमळनेरचे राष्ट्रवादी पक्षाचेआमदार अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *