कळमसरे ग्रामपंचायतमध्ये अहिल्यादेवी जयंतीला तीन कर्तबगार महिलांचा झाला सन्मान
![]()




कळमसरे ग्रामपंचायतमध्ये अहिल्यादेवी जयंतीच्या औचित्य साधून तीन कर्तबगार महिलांचा झाला सन्मान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक ३१/५/२०२३ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय कळमसरे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साह साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील तीन कर्तृत्ववान महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र श्रीफळ शाल व रोख पाचशे रुपये देऊन गावातील सौ मीना रामचंद्र पाटील, श्रीमती अर्चना राजेंद्र महाजन, सौ नौशादबी दस्तगीर पिंजारी या महिलांना सरपंच श्री जगदीश निकम, उपसरपंच श्री पिंटूभाऊ राजपूत, ग्रामपंचायत सदस्य सौ प्रमिला चौधरी, सौ मीना कुंभार,सौ लताबाई भिल, श्रीमती रेश्माबाई चौधरी, श्री दिनकर चव्हाण, सौ पल्लवी चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.

