आज हिवरा आश्रम येथे उज्जैनकर फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन
![]()

आज हिवरा आश्रम येथे उज्जैनकर फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन
महाराष्ट्रातील नामवंत कवी व लेखकांची राहणार उपस्थिती.
हिवरा आश्रम :
शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर बुलडाणा जिल्हा शाखेच्या वतीने प्राचार्य डाॅ.पंढरीनाथ शेळके यांच्या सेवापूर्ती निमित्त आज राज्यस्तरीय कवी संमेलनाचे हिवरा आश्रम येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कविसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ.सतिश तराळ,अमरावती उद्घाटक सुप्रसिद्ध लेखिका डाॅ.प्रतिमा इंगोले पुणे, ,बारोमासकार प्रा.डाॅ.सदानंद देशमुख,गझलकार डाॅ.गणेश गायकवाड,प्राचार्य डाॅ. गोविंद गायकी, बुलडाणा,डाॅ.शिवचरण उज्जैनकर मुक्ताईनगर,कवी तथा समिक्षक किरण डोंगरदिवे मेहकर,प्रा.डाॅ.सुभाष बागल, छत्रपती संभाजीनगर,तुळशीराम बोबडे, अकोला,रागिणी जोशी पुणे ,ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज आळंदी,सोनाली जगताप मुंबई, तसेच विविध जिल्हय़ातील कवि लेखकांची उपस्थिती राहणार असून शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर बुलडाणा शाखेच्या वतीने जिल्हाअध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

