शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतली ठाणे जिल्हा परिषद सीईओ आणि शिक्षणाधिकारी यांची भेट
![]()


शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतली ठाणे जिल्हा परिषद सीईओ आणि शिक्षणाधिकारी यांची भेट
मनीलाल शिंपी ठाणे प्रतिनिधी
दिनांक : 29 मे 2023 ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय श्री जिंदाल साहेब, तसेच शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती ललिता दहीुले मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री कारेकर साहेब यांची भेट घेतली. 1)ठाणे जिल्ह्यातील अंश्:ता अनुदानित व नव्याने अनुदानावर येणाऱ्या 20% अनुदानित शाळांच्या अनुदानाचे आदेश वितरित साठी जावक नंबर पडताळणी बाबत त्वरित कार्यवाही व्हावी, तात्काळ कारवाई करा असे शिक्षणाधिकाऱ्यांना मा, जिंदाल साहेबांनी आदेश दिले 2)प्रलंबित संचमान्यता त्वरित मिळाव्यात प्रलंबित संच मान्यता दुरुस्तीबाबत बाबत कुठपर्यंत कार्यवाही झाली, येणारी अडचण बाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी तात्काल शिक्षण संचालकांशी फोनवरून बोलणे केले, व संत मान्यता त्वरित वितरित करा अशी मागणी केली 3) वरिष्ठ व निवड प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागावेत 4) अनुकंप तत्वाचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता त्वरित द्याव्यात 5) कला शिक्षकांच्या पदवीधर वेतनश्रेणीबाबत 6) मुख्याध्यापक, पर्यवेक्षक मान्यता 7) इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीई प्रतिपूर्ती मिळावी 8) प्रलंबित शालार्थ आयडी 9) अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करणे बाबत *10) विविध शैक्षणिक कामासाठी जिल्हा परिषदेमध्ये सुपूर्द केलेल्या फाईल मध्ये अनेक वेळा त्रुटी निघतात ,त्या त्रुटी निघू नयेत म्हणून, व शाळेतील कर्मचाऱ्यांना वारंवार शिक्षण विभागाचे हेलपाटे होऊ नये, म्हणून शिक्षण विभागांनी शिक्षकाच्या नियुक्तीपासून सेवानिवृत्ती पर्यंत तसेच अन्य कामकाजासाठी चे प्रस्ताव तयार करावे लागतात,

