1 min read

कु. रेवती ठाकूर व कु. कनिष्का भोंबे यांचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार

Loading

कु. रेवती ठाकूर व कु. कनिष्का भोंबे यांचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार

मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल मधून बारावी सायन्स मध्ये कु. रेवती दीपक ठाकूर ही प्रथम आलेली आहे तिला सहाशे पैकी ५०१ गुण मिळून ९१.८३ % एवढे गुण मिळून ती विद्यालयातून सर्वप्रथम आलेली आहे कु. रेवतीला इंजिनियर व्हावे असे वाटते आहे त्याचे वडील श्री दीपक ठाकूर है मार्केटिंग व्यवसाय करत आहेततर आई सौ.सिमाबाई गृहिणी असून भाऊ चेतन हा दहावी मध्ये आहे.
तसेच मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय रुईखेडे येथील मुख्याध्यापक श्री नितीन भोंबे व शिवचरण उज्जैनकर फाउं डेशनच्या कार्यकारिणी सदस्या सौ. जयश्री नितीन भोंबे यांची सुकन्या कु.कनिष्का ही सुद्धा ६०० पैकी ५४४,९०. ६७ % गुण मिळवून या विद्यालयातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. भाऊ चि. अखिलेश हा इयत्ता दहावी मध्ये आहे या दोघे विद्यार्थिनीचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर व खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर यांनी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शाल व उज्जैनकर सर लिखित प्रबोधनाची ज्ञानदिंडी आणि पुणे येथील लेखक श्री विनोद पंचभाई लिखित सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांचे पुस्तक व गुलाबुके देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *