शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
राज्य कार्यकारिणीत ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख राजेश उज्जैनकर तर ठाणे जिल्हा अध्यक्षपदी योगेश बुडुखले यांची निवड

तर अभिनेते, लेखक,पत्रकार,प्रकाश राणे यांची जेष्ठ मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारीत निवड
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावची झूम मीटिंग नुकतीच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी जळगाव जिल्हा सचिव गणेश कोळी सर यांनी प्रास्ताविक केले आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर केली ती पुढील प्रमाणे ठाणे जिल्हा समन्वयक रमेश उज्जैनकर ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख राजेश उज्जैनकर महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ. मीनाक्षी उज्जैनकर ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश बुडूखले उपाध्यक्ष योगेश जोशी महिला उपाध्यक्ष सौ. सुनंदा सोनार सचिव अँड नितीन सपकाळे खजिनदार जगन्नाथ उंबरकर प्रसिद्धीप्रमुख किशोर उज्जैनकर विधी सल्लागार अँड मंदाकिनी पाटील महिला संघटक सौ. सुनीता पोतदार पुरुष संघटक नारायण गोसावी सल्लागार आनंद साबळे आदी बारा पदाधिकाऱ्यांची ठाणे जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही कार्यकारणी कमीत कमी 11 ते जास्तीत जास्त 25 पदाधिकाऱ्यांची असेल राहिलेले पदाधिकारी निवड जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पुढे जाहीर करण्यात येतील याप्रसंगी राज्य अध्यक्ष डॉ.सतीश तराळ यांनी अभिनेते, पत्रकार, लेखक प्रकाश राणे,मुंबई यांची राज्य कार्यकारणीत ज्येष्ठ मार्गदर्शक पदी निवड केली राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मनापासून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी राज्य अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सतीश तराळ राज्य सचिव प्रा. डॉ. सुभाष बागल ज्येष्ठ मार्गदर्शक अभिनेते, लेखक, पत्रकार प्रकाश राणे राज्य संघटक मोहनजी सौंदाणे महिला राज्य संघटक सौ. पूनमताई राणे राज्य सल्लागार ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे गोवा राज्य संघटक डॉ.अनिता तिळवे ठाणे जिल्हा समन्वयक रमेश उज्जैनकर बुलढाणा जिल्हा सचिव शंकरराव अनासूने बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. निवृत्ती जाधव बुलढाणा जिंदा श्री मनोहर काळे जिल्हा महिला प्रतिनिधी डॉ. तृप्ती काटेकर छत्रपती संभाजी नगर जिल्हा संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री परशराम आंबी धाराशिव जिल्हा समन्वयक कवी मधुकर हुजरे तसेच अमळनेर येथील विजय ठाकूर प्रवीण महाजन ठाणे जिल्हा कार्यकारणीतील निवड झालेले सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्यासाठी सहकार्य करण्याचे सर्वांनीच जाहीर केले या या मिटींगचे आभार प्रदर्शन बुलढाणा जिल्हा सचिव शंकरराव अनासुने सर यांनी केले.

