1 min read

वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Loading

वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच लोणी काळभोर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वड,पिंपळ, करंज, चिंच, कडुलिंब, शिरस,आंबा,बकुळ, आवळा,भावा अशा प्रकारची जंगली वृक्ष. युवराज काळभोर यांच्या शुभहस्ते लावण्यात आली . या वेळी
उध्दव मामा कदम,संतोष आबा काळभोर, राहुल वलठे ,विराज काळभोर,अमित जगताप, दत्तात्रय शेंडगे, विशाल लष्कर, बिरूदेव भास्कर, जीवन जाधव उपस्थित होते.
प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आज ही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. वृक्ष केवळ आपले जीवनच प्रभावित करतात असे नव्हे ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्षांपासून आपणास इंधन, इमारती लाकूड, चारा, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधी आदी प्राप्त होते. भूमी आणि जलसंरक्षणाचेही काम वृक्ष करतात. पाण्याचा दुष्काळ, पूर नियंत्रण, जमिनीची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्षच मदत करतात. जमिनींचा ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी वृक्षांचा उपयोग होतो असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *