1 min read

अभिनेते, लेखक प्रकाश राणे यांना वांझोटा या त्यांच्या कादंबरीस तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार सन्मान प्रदान

Loading

अभिनेते, लेखक प्रकाश राणे यांना वांझोटा या त्यांच्या कादंबरीस तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार सन्मान प्रदान

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, लेखक, गीतकार, पटकथाकार, तथा संवाद लेखक, पत्रकार श्री प्रकाश गजानन राणे, मुंबई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वांझोटा या कादंबरीस सन 2021 चा तापी- पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्काराने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेशभाऊ उज्जैनकर यांनी त्यांना प्रमाणपत्र व स्मतिचिन्ह तसेच उज्जैनकर सर लिखित पंख पिसारा आणि प्रबोधनाची ज्ञान दिंडी हे पुस्तक देऊन नुकतेच गौरविले. अभिनेता म्हणून समर्थ रामदास स्वामी तारक मेहता मधील वसंत काका संभाजी मध्ये केशव पंडित नाणी (तृतीय पंथ गुरु ) या ठळक भूमिकांसह साधारण शंभरच्या आसपास नायक ते चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी भूमिका साकारलेले आहे चित्रपट आणि मालिकांसाठी कथा,पटकथा संवाद लेखन तसेच गीतकार म्हणून शंभरहून अधिक गाणी ध्वनीमुद्रत झालेली आहेत ही गाणी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, जावेद अली, सोनू निगम, श्याम, अवधूत गुप्ते, राजा हसन, स्वप्निल बांदोडकर, मंदार आपटे, श्रेया घोषाल, कविता कृष्णमूर्ती ,बेला शेंडे, साधना सरगम, वैशाली सामंत आदी सुप्रसिद्ध गायकांनी अभिनेते तथा गीतकार प्रकाशने राणे यांची गीत गायलेली आहेत
महाराष्ट्र टाइम्स पुण्यनगरी बेधडक महाराष्ट्र नवाकाळ इत्यादी वृत्तपत्रात स्तंभलेखन कमांडर व जगताऱ्यांचे या दिवाळी अंकासाठी सहसंपादक व सध्या हिंदुस्तान 24 तास या न्यूज चैनल मध्ये पोर्टल संपादक म्हणून त्यांचं कार्य सुरू आहे त्यांच्या वांझोटा, बारामतीची माणसं या चर्चित कादंबऱ्या असून कथासंग्रह, शून्य हा काव्यसंग्रह आदी प्रकाशित पुस्तक आहेत. त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांनी त्यांना पुरस्कृत करून गौरवलेले आहे.
या प्रसंगी श्री प्रकाश राणे यांनी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *