सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा- पदवीधर आमदार सत्यजित तांबे
![]()
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 26/5/2023 रोजी ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा येथे सकाळी ठीक 10.00 वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसो श्री. पुरुषोत्तम आत्माराम सोनवणे हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार व निरोप समारंभ साजरा करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री दादासो भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील होते. तर सत्कार मा.श्री दादासो आमदार सत्यजितजी तांबे यांच्या हस्ते पार पडला.
ह्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री आबासो जयवंतराव पाटील माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष श्री संभाजी पाटील व तसेच शिक्षक संघटनेचे नेते आर एच बाविस्कर उपस्थित होते. याशिवाय गुलाबराव हिलाल पाटील अतिरिक्त न्याय दंडाधिकारी नाशिक, श्रीमती प्रभावतीताई जयवंतराव पाटील,कविता महेंद्र पाटील सरपंच करणखेडा
ग्रामविकास शिक्षण मंडळाचे सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती वसुंधरा लांडगे मॅडम यांनी केले सर्व कर्मचारी वृंदाने सहकार्य केले.
तांबे साहेबांनी आपल्या भाषणात सेकंड ईनिंगचा उल्लेख केला मनुष्य सतत कामात राहिल्यास आयुष्य वाढते असे प्रतिपादन केले. आमदार साहेबांनी यापुढे सेवानिवृत्त निवृत्तीचा कार्यक्रम हा सेकंड इनिंगची सुरुवात असा उल्लेख करावा असे म्हटले.
पी ए सोनवणे सरांच्या उल्लेखनीय कामकाजाचा गौरव सर्व वक्त्यानी केला.
संस्थेचे अध्यक्ष श्री आबासाहेब जयवंतराव पाटीलांनी पी ए बापूंचा लहानपणापासूनचा स्नेहबंध उलगडून दाखवला.चांगल्या वागणुकीचे फळ हे चांगलेच मिळते असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक श्री पवार सरांनी केले मनोगत पी वाय पाटील सरांनी केले आभार श्री ए. बी. धनगर सरांनी मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


