1 min read

कमखेड्याच्या वर-वधूची काढलीं ट्रॅक्टर मिरवणूक,
लग्नात ना डीजे ना घोडा ना बगी आनाढायी खर्चाला लगाम

Loading

कमखेड्याच्या नवरदेवांनी काढलीं ट्रॅक्टर मिरवणूक,,,,,,,,,,,,,,,,
लग्नात ना डीजे ना घोडा ना बगी आनाढायी खर्चला लगाम ,,,,,,,,,,
शेतकऱ्याच्या मुलाने काढली स्व मालकीच्या ट्रॅक्टरवर लग्नाची मिरवणूक,,,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा येथील लग्न समारंभात ना घोडा ना डीजे शेतकरी पुऋने स्व मालकीच्या ट्रॅक्टर वर लग्न समारंभात गावातुन मिरवणूक काढण्यात आली
लग्न म्हटले म्हणजे मान पान समान बँड डीजे घोडा बगी इत्यादी तसेच कसे थाटात लग्न संपन्न होईल व लग्नाची प्रतिष्ठा आलेल्या पाहुणे मंडळी ना दिसेल या खर्चात अनेक माता-पिता कर्जबाजारी होता लग्न वधू वर प्रतिष्ठा जपण्यासाठी अनाथाय खर्च करून प्रतिष्ठा दाखवण्याचा वर पिता प्रयत्न करतात मात्र या प्रतिष्ठेला तिलाजली देत कामखेडा येथील कोळी समाजातील दिलीप कोळी यांच्या मुलगा विजय व शिरपूर तालुक्यातील गुजर खदै येथील शरद दावळे यांची कन्या रूपाली यांच्या विवाह कमखेडा येथे दिनांक 21 मे रोजी दिनांक रविवारी संपन्न झाला विजय हा युवक आयटीया करून मुंबई पुणे नाशिक येथे नोकरी करू शकला असता मात्र नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती तसेज स्व मालकीचे सोनाली कंपनीचे ट्रॅक्टर घेऊन आपला चरितार्थ चालवित आहे कोळी समाजातील आदर्श शेतकरी पुत्राने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आयटीआय असून देखील उत्तम प्रकारे शेती सांभाळून मालकीची ट्रॅक्टर घेऊन नोकरीच्या मागे न लागता ट्रॅक्टर व्यवसायातून उत्तम शेती सांभाळत आहे मात्र आपल्या लग्न समारंभात स्वतःच्या मालकीच्या नवीन सोनालिका ट्रॅक्टर वर नव वधू व नवरदेव व संपूर्ण गावात मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला व आपला अभिमान बाळगला तसेच लग्नातील आनाढायी खर्चाला लगाम देऊन अतिशय साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला याबद्दल त्यांचा कमखेड्यातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भडणे येथील आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांचे हस्ते नव वधुचा सत्कार या शेतकरी अभिमाना बद्दल सत्कार करण्यात आला पंचक्रोशीत या लग्न समारंभाचा कौतुकाच्या विषय ठरला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *