1 min read

सोशल मीडियामुळे दुरावलेल्या नात्यांमध्ये आला जिव्हाळा…
कळमसरे येथील एकात्मता ग्रुप
जोपासत आहेत माणुसकी..

Loading

सोशल मीडियामुळे दुरावलेल्या नात्यांमध्ये आला जिव्हाळा…

कळमसरे येथील एकात्मता ग्रुप
जोपासत आहेत माणुसकी..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सोशल मीडियामुळे लोक एकमेकांपासून दूर केल्याची टीका होते मात्र याच सोशल मीडियामुळे अनेक जुने मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत. कळमसरे येथे शारदा माध्यमिक एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजीविद्यार्थी यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन करून साऱ्यांनी एकमेकांच्या सुख दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मैत्री, दोस्ती, यारी निस्वार्थी आणि रक्तापलीकडील या नात्याची अशी कित्येक नाव आहेत. सुखदुःखाच्या क्षणामध्ये कायम सोबत असतात ते म्हणजे आपले मित्र. कोणत्याही परिस्थितीत ही मंडळी आपल्या पाठीशी नेहमीच असतात योग्य मार्गदर्शन, छोट्या समस्या सोडवण्यासाठी आपणही आपल्या मित्र-मैत्रिणींनो अवलंबून असतो. पण डिजिटल युगामध्ये मित्र-मैत्रिणींना भेटणे त्यांच्याशी गप्पा मारणे चर्चा करणाऱ्या गोष्टी कमी कमी होत चालल्याचे दिसते पण कळमसरे येथील एकात्मता गृपच्या मित्र याला अपवाद आहेत.. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मित्र जवळ आलेले आहेत तेवढेच सत्य..
एकात्मता ग्रुपच्या मित्रांच्या राजा नरेंद्र चौधरी दोस्ती के लिए हर शहर बार बार दोस्ती का नाशिक शहर एक बार एकात्मता ग्रुप बनवून आणि गेट-टुगेदर चा कार्यक्रम यशस्वी करणारे अशी ही मित्रांची जोडी सुदाम कोळी आणि देवेंद्र राजपूत हा ग्रुप जर बनला नसता गेट-टुगेदर चा कार्यक्रम झाला नसता .त्यासाठी एकात्मता ग्रुप मधला प्रत्येक मित्रांनी आणि प्रत्येक मैत्रिणींनी तर मनापासून मेहनत घेतली आहे.आज त्याच्याचमुळे नंदू शर्मा आणि देवेंद्र राजपूत प्रत्येक मित्रांच्या सुखदुःखात हजर राहत आहेत आणि मित्रांच्या आणि मैत्रिणीच्या भेटीगाठीसाठी नंदू शर्मा आणि देवेंद्र राजपूत वीरूपाल राजपूत सुदाम कोळी नरेंद्र चौधरी प्रत्येक मित्रांच्या भेटीसाठी घेत आहेत. आठ दिवसापासून नाशिकच्या मित्रांच्या आणि मैत्रिणींच्या भेटीगाठी घेण्यासाठी एकात्मता ग्रुपच्या खरा कोहिनूर नंदू शर्मा आणि विरूपाल राजपूत मित्रांच्या आणि मैत्रिणीच्या भेटीसाठी या दोन मित्रांनी नाशिक शहर गाठलं आणि नाशिकच्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी नरेंद्र चौधरी ,संजू माळी अशोक पाटील सुनंदा बोरसे ,सुरेखा राजपूत या नाशिकच्या मित्रांनी नंदू शर्मा आणि वीरूपाल राजपूत या मित्रांचे जोरदार स्वागत केले. नरेंद्र चौधरी यांनी सर्व मित्रांच्या भेटीगाठी करून दिल्या .त्याकरता नरेंद्र चौधरी यांचे कळमसरे गावातील सर्व मित्र वर्ग आणि एकात्मता परिवारातील सर्व मित्रांनी आणि मैत्रिणींनी नरेंद्र चौधरी यांचे मनापासून कौतुक केले. आज माणूस पैशाने कितीही करोडपती झाला शेवटी मित्रांसाठी मित्रच असतो या नाशिकवाले मित्रांचे जेवढे कौतुक करावं तेवढेच कमी आहे असे एकात्मता गृपचे नंदू शर्मा,देवेंद्र राजपूत यांनी सांगितले.