1 min read

बिगारी काम करणाऱ्यांचा मुलगा झाला महाराष्ट्र पोलीस

Loading

बिगारी काम करणाऱ्यांचा मुलगा झाला महाराष्ट्र पोलीस

विद्यार्थी – नरेंद्र प्रकाश पवार
वडील – प्रकाश सुकदेव पाटील
आई – मनीषा प्रकाश पाटील
शिक्षण – TYBA (प्रताप महाविद्यालय अमळनेर)
विषय – राज्यशास्त्र
पत्ता – खेडी खुर्द प्र. जळोद ता.अमळनेर जि. जळगाव

☀️ वयाच्या 20 व्या वर्षी झाला पोलीस☀️

अमळनेर : तालुक्यातील खेडी खुर्द प्र. जळोद येथील चिरंजीव नरेंद्र प्रकाश पवार यांनी पोलीस भरतीत यश मिळवले आहे. या तरुणाने पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत चांगले गुण प्राप्त केल्याने त्याची निवड झाली. सदर विद्यार्थ्याचे वडील हे बांधकामासाठी बिगारी मजुरीचे काम करतात. आणि आई शेत मजुरीचे काम करतात अशा प्रकारे त्यांचा घरचा उदरनिर्वाह चालतो.
सदर विद्यार्थ्याचे शिक्षण हे प्रताप महाविद्यालयात सुरू आहे. त्याने स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत यश मिळवले आहे. मागच्या तीन वर्षापासून शारीरिक चाचणीची तयारी करत होता आणि अभ्यास ही करत होता. घरची परिस्थिती बिलका बिळकट असतांना पारस्थितीवर मात करत घवघवीत यश मिळवले. आणि पोलीस भरतीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल चाचणीसाठी यथावकाश बोलवण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *