पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी १३६० घेतांना भगवान कुंभार अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात..
![]()

पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी १३६० घेतांना भगवान कुंभार अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात..
जळगांव प्रतिनिधी
यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट – जळगाव.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ३९
रा.लासगाव ता.पाचोरा , जि.जळगाव.
▶️ आलोसे-
१) भगवान दशरथ कुंभार, वय-४४ वर्ष, खाजगी इसम
रा.बांबरुड, ता.पाचोरा जि.जळगाव.
▶️ लाचेची मागणी-
१,३६०/-रूपये
▶️ लाच स्विकारली- १,३६०/-रू.
▶️ हस्तगत रक्कम- १,३६०/-रू.
▶️ लाचेची मागणी –
दि.१७/०५/२०२३
▶️ लाच स्वीकारली
दि.१७/०५/२०२३ रोजी
▶️ * लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्रं.१२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. सदर शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १,३०,०००/-रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले असता सदर कार्यालयात उपस्थित वर नमुद खाजगी इसम यांनी तक्रारदार यांना माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो असे सांगुन सदर कामासाठी तक्रारदार यांच्या आईचे तक्रारदार व साक्षीदाराचे आधारकार्ड झेरॉक्स व आईचे ३ व तक्रारदार यांचे २ यासपोर्ट फोटो सांगितले.व सदर खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देण्याच्या मोबदल्यात
१,३६०/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आरोपी यांनी बांबरुड येथील त्यांचे स्वतःचे घरी पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.8766412529
▶️ सापळा व तपास अधिकारी-
PI श्रीमती.एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.8691824333
▶️ सापळा पथक-
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
▶️ कारवाई मदत पथक-
PI.श्री.संजोग बच्छाव,लाप्रवि जळगाव मोबा.नं.9823128038
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
▶️ मार्गदर्शक-
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9823291148
3) मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529

