1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, मेहकर येथे जिल्हा बैठक संपन्न

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, मेहकर येथे जिल्हा बैठक संपन्न

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव , बुलढाणा जिल्हा बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था चिखली, मेहकर येथे नुकतीच संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे राज्य प्रसिध्दी प्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके बुलढाणा जिल्हाध्यक्ष शाहीर मनोहरराव पवार जिल्हा समन्वयक शितल शेगोकार बुलढाणा जिल्हा संघटक तथा संजीवनी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्तीभाऊ जाधव अग्रवाल रिसोरडचे मालक श्री अशोकजी अग्रवाल जिल्हा कोषाध्यक्ष श्री दिनकरराव झनक सर श्री प्रदीप मोरे सर कवी प्रशांत डोंगरदिवे कवी मिलिंद भंडारे कवी सुरेश अवसरमोल श्री गजानन जाधव आदी पदाधिकारी या सभेला उपस्थित होते याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे शिव, बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन बुलढाणा जिल्ह्यामध्ये करण्याविषयी त्याचप्रमाणे फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांचा 31 मे रोजी सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करणे विषयी चर्चा करण्यात आली प्रसंगी फाउंडेशनचे विविध पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर या सभेचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी केले तर आभार जिल्हा संघटक डॉ. निवृत्ती जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *