1 min read

प्रताप महाविद्यालयाला तीन दात्यांकडून चार लाखाची देणगी

Loading

प्रताप महाविद्यालयाला तीन दात्यांकडून चार लाखाची देणगी

गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्यपदक दिले जाणार

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय शिक्षणाचा दर्जा टिकविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे.
विविध विषयात गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून समाजातील काही दानशूर लोकं पुढे येत आहेत. प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयाला तीन दात्यांकडून सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सन्मानासाठी सुवर्ण व रौप्यपदकासाठी देणगी देण्यात आलेली आहे.
श्रीमती शोभना शरद पेंडसे (पुणे) यांनी रुपये दोन लाखाची देणगी दिली आहे. त्यातून दरवर्षी प्रा. शरद पंढरीनाथ पेंडसे स्मृतिप्रित्यर्थ भूगोल विषयात पदवी व पदव्युत्तर वर्गात सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थिनीला सुवर्णपदक दिले जाणार आहे.
तर श्री. सुभाष मणिलाल शहा व अंकित सुहास शहा यांनी रुपये एक लाखाची देणगी दिली आहे. त्यातून दरवर्षी कै. मणिलाल भागचंद गुजराथी स्मृती प्रित्यर्थ टी.वाय.बी.सी.ए या वर्गात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला -विद्यार्थिनीला सुवर्णपदक दिले जाणार आहे.
तसेच श्रीमती धनश्री रघुनाथ भंडारी (राजुरा, जि. चंद्रपूर) यांनी एक लाखाची देणगी दिली आहे. त्यातून दरवर्षी कै. रघुनाथ लक्ष्मीकांत भंडारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पदार्थ विज्ञान या विषयात पदवी व पदव्युत्तर वर्गात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी रौप्यपदक दिले जाणार आहे.
सर्वप्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळावे व तसेच आपल्या जिवलगांच्या स्मृती सदैव जागृत राहाव्यात या उदात्त हेतूने ही देणगी संबंधित दात्यांनी संस्थेकडे कृतज्ञतापूर्वक समर्पित केली आहे.
याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, संचालक हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, सी.ए. नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विनोद पाटील, कल्याण पाटील चिटणीस तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, यांनी यासंदर्भात देणगी देणाऱ्या दात्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *