1 min read

महिला सन्मानासाठी सरकारचे पाऊले!

Loading

महिला सन्मानासाठी सरकारचे पाऊले! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा सन्मानासाठी राज्य सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक गावातील कर्तबगार दोन महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे, महाराष्ट्र शासनाचे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य धनगर समाजाच्या वतीने अभिनंदन! यानिमित्ताने महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच त्यांना कार्यप्रणव ठेवण्याची ऊर्जा बनवणार आहे. म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी! महिला सक्षमीकरणासाठी खूपच चांगला निर्णय आहे....

डी ए धनगर
अमळनेर जि जळगांव
माजी जिल्हाध्यक्ष धनगर समाज कर्मचारी संघटना जळगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *