1 min read

जुन्या पेन्शन साठी मुख्यमंत्र्यांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे साकडे
मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश

Loading

जुन्या पेन्शन साठी मुख्यमंत्र्यांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे साकडे
मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश

मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे, जुन्या पेन्शनचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली सौ संगीता ताई शिंदे ,श्री सुनील भोर, श्री सचिन नलावडे, आप्पा पाटील सर, श्री दत्ता पाटील सर अन्य जुनी पेन्शन समन्वयक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन तातडीने बैठक लागावी म्हणून आज सकाळी 8.00 वाजल्यापासून रात्री 9:00 पर्यंत सह्याद्री या ठिकाणी थांबून शेवटी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व बैठकीचे आश्वासन घेऊन बाहेर पडले.
मुख्यमंत्री यांनी तातडीने बैठक लावा असे आदेश त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
येत्या दोन दिवसात कधीही मीटिंग लागू शकते.
2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन लागू व्हावी म्हणून आज पहिली सभा सुकाणू समितीची झाली त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.