मल्लिकार्जुन खरगे दलित समाजाचे असल्याने कॉंग्रेसने त्यांना संधी आली तेव्हा मुख्यमंत्री केले नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
काँग्रेस ने दलितांना कधीही न्याय दिला नाही
![]()

मल्लिकार्जुन खरगे दलित समाजाचे असल्याने कॉंग्रेसने त्यांना संधी आली तेव्हा मुख्यमंत्री केले नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
काँग्रेस ने दलितांना कधीही न्याय दिला नाही
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – काँग्रेसने नेहमी दलित मतांचा वापर केला मात्र दलितांना कधीही न्याय दिला नाही. मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची संधी जेव्हा आली होती तेव्हा ते दलित समाजाचे असल्याने काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री केले नाही. खरगे यांना काँग्रेसने पक्षाध्यक्षपद दिले असले तरी ते नामधारी अध्यक्ष आहेत. काँगेसच्या अधिकारांचे सर्व सुत्र राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडेच आहे.
त्यामुळे दलितांना न्याय देवू शकत नसणा-या काँग्रेस पक्षाला कर्नाटकच्या निवडणुकीत पराभवाचा धडा शिकवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. बिदर आणि बेळगांव या जिल्हयात भाजप उमेदवारांचा प्रचार ना. रामदास आठवले यांनी केला. त्यात बिदर येथील सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, भाजपचे उमेदवार प्रकाश खडरे उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर काँग्रेस नेत्यांनी 91 वेळा शिवीगाळ केली आहे. काँग्रेसच्या या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. काँग्रेसने कितनी भी दी मोदीजी को गाली लेकिन मोदी है गरिबोंके सच्चे वाली अशी कविता सादर करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे खरे विकासपुरुष नेते असल्याचा गौरव ना. रामदास आठवले यांनी केला. ज्यांना घर नाही त्यांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, गॅस मोफत देणारी उज्वला योजना, गरीब बेरोजगारांना धंदा उद्योगासाठी विना अट कर्ज देणारी मुद्रा योजना, ज्यांचे बँकेत खाते नाही अशा गरीबांना बँक खाते खोलून देण्याचे काम अशी गरीबांना मदत करणारी अनेक कामे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे करीत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे गरीबांचे खरे वाली आहेत. त्यांना शिवी देणा-या काँग्रेसला पराभवाची धुळ चारा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

