रक्तदान चळवळीचे प्रवर्तक, युवा मित्र परीवाराचे मनोज शिंगाणे यांनी लग्नाच्या वाढदिवसाला रक्तदान करत समाजासमोर ठेवला आदर्श…
![]()


रक्तदान चळवळीचे प्रवर्तक, युवा मित्र परीवाराचे मनोज शिंगाणे यांनी लग्नाच्या वाढदिवसाला रक्तदान करत समाजासमोर ठेवला आदर्श…
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर रक्तदान चळवळीचे प्रवर्तक अमळनेर युवा मित्र परिवाराचे मनोज शिंगाणे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला रक्तदान करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
“आपण समाजाचे देण लागतो या भावनेने आपल्या परिने समाजासाठी जे जे करता येईल ते केलच पाहीजे या उद्देशाने रक्तदानासारखे पवित्र कार्य आयुष्यातील शुभ दिवसांना करण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने मनोज शिंगाने यांनी आपली पत्नी सौ.ज्योती शिंगाने व परिवाराच्या उपस्थितीत जीवनश्री रक्तपेढीत रक्तदान केले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी मनोज शिंगाने व सौ ज्योती शिंगाने यांना विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजउपयोगी असा रक्तदानाचा आदर्श निर्माण केल्याबद्दल दोघांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यात. यावेळी परिवारातील कु दिया शिंगाणे ,कु.प्राची शिंगाणे तसेच रक्तपेढीचे ललित चित्ते ,गणेश पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे यांनी अमळनेर नगरीला भविष्यात “रक्तदात्यांची नगरी” म्हणून संबोधली जाईलच असे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

