1 min read

आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण उष्माघात असल्यामुळे स्थगित, प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी प्रशिक्षण स्थळी न येऊ नये – महासमादेशक पितांबर महाजन.

Loading

आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण उष्माघात असल्यामुळे स्थगित, प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी प्रशिक्षण स्थळी न येऊ नये :: महासमादेशक पितांबर महाजन.

:ठाणे. 🙁 प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष संजयराव शेंडे, व महासमादेशक पी.एस. महाजन यांचा विनंती पत्रानुसार ठाणे जिल्ह्यातील भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, तालुका कल्याण येथे,शिक्षण संचालक यांचा २०२२/२०२३ पत्रातील संदर्भानुसार , माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती ललिता दहितुले यांचा आदेशानुसार दिनांक ५ मे ते १४ मे २०२३ पर्यंत आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व नियोजन केले होते.परंतु अति उष्णता ,उष्माघात ( कडक उन्हाळा) असल्यामुळे आरोग्याचा दृष्टीने संभाव्य धोका टाळण्यासाठी आज दिनांक ४ मे २०२३ रोजी आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी स्थगित केले असून तशी माहिती जिल्हाधिकारी यांना दिली आहे.आणि अध्यक्ष/महासमादेशक, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटन नागपूर यांनाही देण्यात आली असून, त्यानुसार , महासमादेशक पी.एस.महाजन यांनी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शिक्षक बंधुभगिंनी यांनी येऊ नये अशी सूचना दिली आहे. पुढील नियोजन कळविण्यात येईल असे मत आमचा प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *