1 min read

व्हॉइस ऑफ मीडियाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात डॉक्टर शरीफ बागवान यांची राष्ट्रीय मीडिया समन्वयक पदी नियुक्ती

Loading

व्हॉइस ऑफ मीडियाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात डॉक्टर शरीफ बागवान यांची राष्ट्रीय मीडिया समन्वयक पदी नियुक्ती

महाराष्ट्र सदन व्हाईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे दि.२८ एप्रिल २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले.सदरहू अधिवेशनात भारतातील सर्व राज्यातील कर्तव्यतत्पर निर्भय शोध पत्रकारांना पदाधिकारी पदी नियुक्ती समारंभपूर्वक देण्यात आली. आजतागायत व्हॉइस ऑफ मीडियाचे २८ हजार पत्रकार सभासद झाले आहेत.संघटनेला दोन वर्षांमध्ये नावलौकीक व उत्तुंग यश मिळवून देण्याचे कार्य पदाधिकाऱ्यांनी केल्याने दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात पत्रकार आमदार संजय राऊत यांनी केले. अधिवेशनाला प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक कॉम्रेड भालचंद्र कांगो ,वाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, उपाध्यक्ष फिरोज पिंजारी महिला संघटक सारिका महोतरा,गगन महोतरा ,उर्दू विभाग राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हारून नदवी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.शरीफ बागवान यांची व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटर पदी नियुक्ती झाली.नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व ज्येष्ठ साहित्यिक कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते देण्यात आले.डॉ शरीफ बागवान सामाजिक कार्यकर्ते यांनी व्हाय साप मीडियाचे कार्य संपूर्ण भारतामध्ये पसरवून भारताचा प्रत्येक गावातील प्रत्येक पत्रकाराला संघटनेशी जोडण्यात येईल व त्यांचे हक्कांसाठी लढा उभारण्यात येईल असे व्यापक उदिष्ट जाहिर केले.डॉ.शरीफ जळगाव मेहरूण येथील बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशनचे अध्यक्ष,बी.वी न्युज २४ चे संपादक व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत.तसेच अनेक संस्थांचे पदांना आपल्या झपाटलेल्या कार्य प्रणालीने न्याय देत आहेत . भारतीय पत्रकार संघाचे सचिव ,अखिल भारतीय ज जर्नालिस्ट फेडरेशनचे नॉर्थ इंडिया सेक्रेटरी,पोलीस मित्र संघटना चे महाराष्ट्र समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.डॉ.बागवान हे महाराष्ट्र गौरव पुरस्कार,राज्यस्तरीय मोलाना आजाद आदर्श समाज सेवक पुरस्कार व रोटरी क्लब ऑफ इंडियाचे पोलिओ डिस्ट्रिक्ट अवॉर्डने सन्मानित आहेत.अखिल भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र स्टेट सेक्रेटरी ,अखिल भातीय जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि अन्याय अत्याचार भ्रष्ट्राचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष ,नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरमचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटर पदी नियुक्ती झाल्याने खलील सुर्वे सुधीर माने , प्रकाश पाटील,आबिद अली सय्यद ,फरान शरीफ,डॉ.संदीप सपकाळे,डॉ.अतुल पाटील,एडव्होकेट भूषण सूर्यवंशी,एडव्होकेट योगेश वाणी,अजहर खान,नाझीम निसार,अश्फाक अलीम, अमीन निसार ,समीर सलीम यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी,आप्तेष्ट व मित्र – परिवारातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *