1 min read

ज्येष्ठ विचारवंत डॉ आ.ह साळुंखे यांचा शिव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित..

Loading

डॉ. आ. ह. साळुंखे यांचा शिव जीवनगौरवने सन्मान….
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात नुकत्याच झालेल्या शिव महोत्सव २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ ह साळुंखे सर यांना शिवजीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने दि,२२ एप्रिल रोजी साळुंखे सर हे प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते मात्र त्यांनी ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून ऑनलाईन विद्यार्थी आणि विद्यापीठातील सर्वांशी संवाद साधला होता. रविवार दि.३० एप्रिल २०२३ रोजी कोल्हापूर येथे नालंदा अकादमी आणि लोकायत प्रकाशन संस्था यांच्यावतीने आयोजित सत्य असत्यशी मन केले ग्वाही या पुस्तकावरील चर्चासत्रात आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ .प्रवीण कोडोलीकर व डॉ.सरोज बिडकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन साळुंखे सर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ.हरि नरके, डॉ.राजन गवस ,डॉ.रणधीर शिंदे,डॉ.नंदकुमार मोरे,राकेश साळुंखे ,डॉ. अमर कांबळे, अमित मेधावी, डॉ. प्रशांत गायकवाड, मंदार पाटील,मंजित माने, महेश राठोड,नितिन पाटील ,अजिंक्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ.साळुंखे सर यांचे शिव-जीवन गौरव पुरस्काराचे मानपत्र डॉ.कपिल राजहंस सर यांनी शब्दांकन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *