1 min read

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्न सोडवण्याबाबतची चर्चा

Loading

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्न सोडवण्याबाबतची चर्चा

मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आदरणीय विश्वास काटकर साहेब यांच्या बरोबर, महाराष्ट्र राज्यात झालेला बेमुदत संप व महाराष्ट्र शासनाने घेतलेली दखल, त्यानंतर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयामुळे कुटुंब निवृत्ती वेतन योजना, सेवानिवृत्त उपदान, रुग्णता कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यात आले आहे. पण 2005 पूर्वी कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयानुसार काहीही लाभ मिळालेले नाही??? त्याबाबत मध्यवर्ती संघटना या कर्मचाऱ्याबाबत कोणता निर्णय घेणार याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आज दिनांक 27 मार्च 2023* रोजी आदरणीय विश्वास काटकर साहेब यांच्या समवेत, विविध संघटनेची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण संघर्ष संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सुप्रीम कोर्टातील केस संदर्भात वकील सुरेश पाकळे साहेब यांच्याबरोबर सध्याचा सुप्रीम कोर्टातील आढावा व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्याबाबत 23 मार्च 2023 चा शासन निर्णय, आपल्या केसच्या संदर्भात आपल्यासाठी कितपत उपयोगी होईल का??? याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कोर कमिटीच्या अध्यक्षा सौ संगीताताई शिंदे, प्रा. दिलीप डोंगरे ,सुदेश जाधव, अभिजीत धानोरकर, सचिन पगार, अशितोष अशितोष पवार शरद तिरमारे हे कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *