1 min read

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास दुसऱ्यादा राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल……

Loading

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास दुसऱ्यादा राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल……

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अमरावती द्वारा येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेत अमळनेर पैलाड येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय मधील खेळाडू सैय्यद निजामअली हसनअली यांने १९ वर्षाआतील ९० किलो वजनगटात सहभाग घेऊन सिल्वर मेडल प्राप्त करून राज्यस्तराव द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
तरी या खेळाडूचा विद्यालया तर्फे सत्कार करण्यात आला.
याला संस्थेचे चेअरमण साहेब मा.श्री.अविनाश संदानशिव,मुख्याध्यापक श्री.आंनदराव नेतकर सर पर्यवेक्षक श्री.डि.एस.पाटील सर यांनी कौतुक केले.
या खेळाडूस शाळेचे मुख्याध्यापक श्री.आंनदराव नेतकर सर , क्रीडा शिक्षक श्री.निलेश विसपुते तसेच सैय्यद हसनअली यांचे मार्गदर्शन लाभले.या सत्कार वेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *