1 min read

कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ,सावंतवाडी शिक्षणाधिकाऱ्यांशी बैठक !

Loading

कोकणशिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ,सावंतवाडी शिक्षणाधिकाऱ्यांशी बैठक !

मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी):शिक्षण सावंतवाडी विभागातील सर्व प्रश्न तात्काळ सुटायला हवेत ते तात्काळ सोडवा मी पुढच्या दौऱ्यात येईन त्यावेळी ते सुटलेले दिसायला हवेत वाढीव अनुदानासाठी विद्यार्थी पटसंख्येची अट घालण्यात आली आहे त्या संदर्भात शासन विद्यार्थी पटसंख्या अट कमी करण्याबाबत विचार करत आहे तसेच माध्यमिक शाळा ला जोडणारे इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग प्राथमिक ला जोडू नयेत अशा सूचना कोकण शिक्षक मतदार संघाचे .ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केल्या आज गुरुवारी आज प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मुस्ताक.शेख तसेच वेतनपथक शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचारी यांच्या समवेत आढावा बैठक स़ंपन्न झाली.

यावेळी प्रास्ताविक माध्यमिक विस्तार अधिकारी सौ.मांजरेकर यांनी केले तर स्वागत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.शेख यांनी केले यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे , सचिव श्री.गुरूदास कुसगावकर तसेच राज्य महामंडळ उपाध्यक्ष श्री रामचंद्र.घावरे व विविध शिक्षकेतर संघटनाचे पदाधिकारी तसेच जिल्हा भरातील शिक्षक, शिक्षकेतर व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *