कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या युद्धरत ला राज्यस्तरीय पुरस्कार
![]()


कवी शशिकांत हिंगोणेकर
यांच्या युद्धरत ला राज्यस्तरीय पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड,पुणे या संस्थेने राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांची नुक्तीच घोषणा केलेली आहे. यात कविता विभागात ऐंशी कवितासंग्रह प्राप्त झाले होते. यातून निवड समितीने शशिकांत हिंगोणेकर यांचा वर्णमुद्रा पब्लिकेशन्स, शेगाव, जि. बुलढाणा प्रकाशक श्री. मनोज पाठक यांनी प्रकाशित केलेल्या युद्धरत या कविता संग्रहाची उत्कृष्टवाड़्मय पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. म.सा.प. पिंपरी चिंचवड पुणे शाखेचे अध्यक्ष श्री. राजन लाखे आणि कार्यवाह श्री. संजय जगताप यांनी पुरस्कार निवडपत्र काढून घोषित केले आहे. २५००/-रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. २८एप्रिल २०२३ लख सकाळी १०वा. प्रतिभा महाविद्यालय सभागृह ,काळभोर नगर,टायटन शोरुमच्या मागे,जुना मुंबई पुणे रस्ता,चिंचवड पुणे-४११०३३ येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कवी शशिकांत हिंगोणेकर यांचे मनःपुर्वक अभिनंदन!

