कल्याण येथे संत गोरोबाकाका (कुंभार) यांची पुण्यतिथी साजरी’
संत गोरोबांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कुंभार समाजाने संघटित होण्याची गरज – रमेश मोरे
![]()

कल्याण येथे संत गोरोबाकाका (कुंभार) यांची पुण्यतिथी साजरी
संत गोरोबांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कुंभार समाजाने संघटित होण्याची गरज आहे. ::रमेश मोरे
मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी): कल्याण खान्देश कुंभार समाज कल्याण च्या वतीने संत शिरोमणी,श्रेष्ठ संत, वैराग्याचे महामेरू, राष्ट्रसंत गोरोबाकाका कुंभार यांच्या 706 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सादर करण्यात आला. खानदेशातील विविध जिल्ह्यातील कुंभार समाज कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे, कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कल्याण परिसरातील अनेक समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या. खान्देश कुंभार समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष रमेश मोरे व जेष्ठ समाजबांधव प्रकाश बोरसे, समाज मंडळाचे खजिनदार अशोक वाघ,सचिव संजीव सोनवणे, सल्लागार रंगराव मोरे, सहसचिव .देवानंद चव्हाण,उपाध्यक्ष श्री.नरेंद्र मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गोरोबाकाका यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध चव्हाण यांनी सादर केले.या कार्यक्रमासाठी जगदीश कुंभार, भगवान वाघ,मुकेश जगदाळे,अर्जुन चव्हाण,गुलाब वाघ,विकास मोरे,आत्माराम सोनवणे,चेतन मोरे,विजय मोरे,प्रमोद कुंभार,दिनेश वाघ,मोरे इ.समाज बांधव व अनेक महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.मंडळाचे अध्यक्ष रमेश मोरे यांनी समाज संघटित होणे का आवश्यक आहे तसेच विविध कार्यक्रम आपण घेतले पाहिजेत असे मत मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिरुद्ध चव्हाण यांच्या सह सर्व समाज बंधुभगिनिनी विषेश परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अशोक वाघ यांच्याकडे यांच्याकडे करण्यात आले होते.

