विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्यू कॉलेजचे अनिल पाटील साईरत्न पुरस्काराने सन्मानित…
![]()

सायं दैनिक साईमत वृत्त समूहाकडून सन 2022 -2023 चा साईरत्न पुरस्कार अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल व ज्यू कॉलेजचे उपक्रमशील शिक्षक श्री अनिल नथू पाटील यांना परिवारासह अप्पर जिल्हाधिकारी श्री प्रवीण महाजन, माजी माहिती आयुक्त, नागपूर श्री व्हीं डी पाटील, भुसावळ येथील प्रसिद्ध नाक, कान, घसा तज्ञ डॉ. श्री सुरेंद्र भिरूड व साईमत वृत्तसमूहाचे संचालक श्री प्रमोद बऱ्हाटे यांच्या उपस्थितीत परेश हॉलिडे रिसॉर्ट, जळगाव येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी प्रशासकीय, वैद्यकीय, सामाजिक, उद्योजक, तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा साईरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिल पाटलांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांचे नातलग ,मित्र परिवार उपस्थित होते.

