1 min read

अमळनेर जैन सोशल ग्रुपची कार्यकारणी जाहीर

Loading

अमळनेर जैन सोशल ग्रुपची कार्यकारणी जाहीर

अमळनेर:

येथील जैन सोशल ग्रुपची सन २०२३ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यावेळी झालेल्या समारंभात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, मालेगाव येथूनसचिन शाहधुळे येथून,दिलीप कुचेरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.नवीन कार्यकारणी अध्यक्ष म्हणून देवांग शाह,सचिव म्हणून सौरव जैन,खजिनदार म्हणून राजेश बेदमुथा, उपाध्यक्ष म्हणून रोनक संकलेचा, आयपीपी म्हणून दिनेश लोढा, सहखजिनदार म्हणून प्रितेश जैन ,पूनम कोचर, ऋषभ पारख,सचिन चोपडा, प्रदीप पारख, रक्षा पारख, प्रीती शाह,सोम्या जैन ,गोकुल पारख, निखिल पारख, धीरज कोचर, रोनक पारख, महावीर सिंगवी, कल्पेश झाबक, प्रितेश पारख, यांची निवड करण्यात आली. मागील वर्षाच्या सर्व राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिल्यावर प्रोजेक्ट प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र रिजनल  मिशन जलदराचे प्रमुख म्हणून पूनम कोचर व बेटी बचाव बेटी पढाव रिजलन प्रमुख म्हणून ऋषभ पारख यांची निवड  करण्यात आली. नवीन कार्यकारिणीला शपथ देऊन वर्षभरात समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा सिंगवी, खुशबू लोढा, पूजा पारख                

तर आभार सौरभ जैन यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक अर्बन बँक व खाशी मंडळाचे संचालक, पत्रकार,जैन समाजाचे सर्व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नवीन कार्यकारिणीचा उपस्थित सर्वांनी  सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *